Pradeep Purnekar murder case : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: राजेंद्र शिंदे यांची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी; शस्त्रांचे गूढ कायम

Rajendra Shinde questioned again as SIT probes Thane murder case; missing weapons remain key investigative challenge : ठाण्यातील हत्या प्रकरणात पाच आरोपींना अटक; दुसरे पिस्तूल आणि तीन धारदार शस्त्रे अद्याप हस्तगत नाहीत. SIT तपासाबाबत अधिकाऱ्यांची गोपनीयता कायम.
Pradeep Purnekar
Pradeep PurnekarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Thane murder case : ठाणे येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात एकनाथ शिंदे शिवसेनेचे राजेंद्र शिंदे यांची सलग तिसऱ्या दिवशी विशेष पथकाकडून चौकशी सुरू आहे.

या चौकशींमुळे राजेंद्र शिंदे यांच्याभोवती संशय बळावतोय, अशा चर्चांना जोर धरला आहे. हत्याकांडांत वापरलेले दुसरे पिस्तूल आणि तीन धारदार शस्त्रे अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसल्याने शस्त्रांचे गूढ कायम आहे. यात आरोपी सहकार्य करत नसल्याचे देखील समोर येत आहे.

शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे (ShivsenaUBT) प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात राजेंद्र शिंदे यांची गेल्या तीन दिवसांपासून विशेष पथकाकडू चौकशी सुरू आहे. ⁠मंगळवारी राजेंद्र शिंदे यांची नऊ तास चौकशी झाली होती. त्यानंतर लगेच बुधवारी आठ तास चौकशी झाली. आता देखील चौकशीला पथकाने बोलावले आहे. यामुळे पोलिस तपास निर्णायक वळणावर आहे, अशी चर्चा सुरू आहे.

या सलग चौकशींमुळे ⁠SIT पथकाला राजेंद्र शिंदे यांच्यावर संशय बळावतोय का? ⁠पूर्णेकर हत्या प्रकरणात SITच्या हाती महत्वाचे पुरावे लागलेत का? ⁠राजेंद्र शिंदे यांचा या प्रकरणात रोल येतोय का? ⁠तिसऱ्यांदा चौकशी होतेय, याचा अर्थ काय? चौकशीबाबत पोलिस (Police) अधिकाऱ्यांनी गोपनीयता बाळगली आहे. तपास कुठेवर आला आहे, याचे अपडेट समोर आणले जात नाही. परंतु राजेंद्र शिंदे यांची ज्यापद्धतीने चौकशींचे सत्र सुरू आहे, त्यामुळे चर्चांनी जोर धरला आहे.

Pradeep Purnekar
BJP corporators assault allegations : मिरा-भाईंदर महापालिकेत राडा! पत्रकारांना मारहाण केल्याचा भाजप नगरसेवकांवर आरोप

दरम्यान, प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येत आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यातील संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि अमित सिंग उर्फ पपलू या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. दुसरे पिस्तूल आणि तीन धारदार शस्त्रे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नसल्याने शस्त्रांचे गूढ कायम आहे.

Pradeep Purnekar
Nida Khan divorce case : टीसीएस प्रकरणातील गरोदर निदा खानच्या वैवाहिक वादाला न्यायालयीन वळण; पती घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम

हत्येसाठी वापरण्यात आलेली शस्त्रे आणि त्यांची विल्हेवाट याबाबत पोलिसांकडून आरोपींची चौकशी केली जात आहे. या प्रकरणात आतापर्यंत एक पिस्तूल आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे. मात्र दुसरे पिस्तूल आणि शस्त्रांबाबत आरोपींकडून अपेक्षित माहिती मिळत नसल्याने तपासात अडचणी येत आहे. त्यामुळे उर्वरित शस्त्रे हस्तगत करणे तपास पथकासमोर मोठे आव्हान ठरले आहे. राजेंद्र शिंदे, मीनाक्षी शिंदे आणि सध्या चौकशी सुरू असलेले दोन्ही आरोपी यांना समोरासमोर बसवून आणखी चौकशी लांबवण्याची शक्यता आहे.

चप्पल अन् बुटाचे रहस्य काय

हत्येतील संशयित आरोपी सुभाष उर्फ पप्या शिंदे नेहमी चप्पल घालणारा प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या दिवशी शूज घालून कार्यालयात आला होता. पूर्णेकर यांच्या केबिनचा दरवाजा उघडा ठेवता यावा, यासाठी त्याने शूज न काढताच केबिनमध्ये प्रवेश केल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली.

घटनास्थळी पाच पुंगळ्या

प्रदीप पूर्णेकर यांच्यावर करण्यात एकूण सहा गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. त्यापैकी दोन गोळ्या पूर्णेकर यांना लागल्या. घटनास्थळी पाच पुंगळ्या आढळल्या, तर एक राउंडही मिळून आला. हा राउंड 7.62 मिमीचा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com