सुषमा अंधारे यांनी धर्म आणि राजकारण एकत्र केल्याचा आरोप भाजपवर केला आहे.
त्यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावर द्वेष पसरवण्याचा आरोप करत टीका केली.
आखातातून तेल घेणे बंद करणार का असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
Kokan/Nashik News : राज्यात सध्या अशोक खरात प्रकरण चंगलेच गाजत असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर आसूड उगारण्यास सुरूवात केली आहे. नुकताच त्यांनी खरात प्रकरणात तळकोकणातील शिंदेंच्या शिवसेनेचे नेते, माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्यावर जोरदार निशाना साधला होता. यामुळे शिवसेना अडचणी आल्याची चर्चा राज्यभर सुरू झालीय.
अशातच आता अंधारे यांनी आपला मोर्चा माजी मुख्यमंत्री नारायण राणेंकडे वळवत आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका घेणार्या नितेश राणेंवर तोंडसुख घेतले आहे. त्यांनी राणेंना राजकारणातून वेळ न मिळाल्याने ते आपल्या मुलांवर संस्कार करण्यात कमी पडले, अशा शब्दात बोचरी टीका केली आहे. त्या नाशिक येथे भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्त झालेल्या व्याख्यानमालेत बोलत होत्या.
जगातील कोणताही धर्म दुसऱ्या धर्माबद्दल द्वेष शिकवत नाही. पण, आजच्या घडीला देशात सत्ताकारणाला धर्माची जोड दिली जात आहे. अध्यात्माच्या नावाखाली जनतेची सहनशक्ती वाढवली जात आहे. हीच नाळ ओळखून भारतीय जनता पक्षाने अध्यात्माचे मार्केटिंग सुरू केल्याचा आरोप अंधारे यांनी केला.
यावेळी कोंडाजीमामा आव्हाड, खासदार डॉ. शोभा बच्छाव, शिवसेना (उबाठा) पक्षाचे गटनेते प्रथमेश गिते, माजी महापौर दशरथ पाटील, माजी आमदार अनिल कदम, शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते दत्ता गायकवाड, सोनल दगडे, शांतिलाल दुगड, विजय टाटिया आदी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाने अध्यात्माचे मार्केटिंग सुरू केल्याचा आरोप करताना अंधारे यांनी आजच्या समाजाच्या मानसिकतेमुळे अशोक खरातसारखी प्रवृत्ती बळावते आहे, अशी टीका केलीय. तसेच अध्यात्म म्हणजे स्वतःचा शोध घेणे व आत्म्याची शुद्धी करणे होय.
पण, आजच्या सत्ताधाऱ्यांनी अध्यात्म आणि राजकारणाची सरमिसळ केली आहे. या माध्यमातून राजकारणी सत्तेचा मार्ग अधिक बळकट करत आहेत. त्याच जोरावर भाजप सत्ताकारण करत असल्याची टीकाही त्यांनी केलीय. याच व्याख्यानात त्यांनी आपले परखड मत मांडताना मंत्री नितेश राणे यांच्यावर टीका केली.
नितेश राणे धर्माच्या नावाखाली द्वेष पसरविण्याचे काम करत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना राजकारणातून वेळ न मिळाल्याने ते आपल्या मुलांवर संस्कार करण्यात कमी पडले, अशा शब्दांत त्यांनी सुनावले आहे.
एकीकडे राज्यातले आणि केंद्रातले सरकार हे हिंदुत्ववादी असल्याचा दावा करत मुस्लिम बांधवांशी व्यवहार करू नये असा अपप्रचार केला जात आहे. तसे आवाहन भाजपचे मंत्री करताना दिसत आहेत. पण जर मुस्लिम बांधवांशी तुम्हाला व्यवहार करायचा नसेल तर पहिले आखातामधून तेल घेणे बंद करणार का? असा थेट सवाल त्यांनी आव्हान मंत्री राणेंना केलं आहे.
नेमकं काय म्हणाले होते नितेश राणे?
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर भाजपचे मंत्री, आमदार हे मुस्लिमांच्या विरोधात बोलताना दिसत आहेत. मंत्री नितेश राणेही अशाच पद्धतीने वादग्रस्त वक्तव्य करताना दसत असून हिरवे साप असे बोलताना दिसत आहेत. आताही नुकताच त्यांनी, सर्वधर्म समभावाचं कॉन्ट्रॅक्ट फक्त हिंदूंनीच घेतलंय का? असा सवाल केला होता. तसेच रमजान काळात हिंदूंना दुकान लावायला देतात का? असे वक्तव्य त्यांनी केले होते. तर नाशिकमधील कुंभमेळ्यात किंवा हिंदूंच्या पवित्र उत्सवांमध्ये फक्त हिंदूंचीच दुकाने लागली पाहिजेत, असा आग्रह त्यांनी धरला होता. यावरून सध्या वादाची वात पेटली असून यावरूच अंधारे यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेणार्या नितेश राणेंवर तोंडसुख घेतले आहे.
1. सुषमा अंधारे यांनी काय आरोप केला?
भाजप धर्माचा वापर सत्तेसाठी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
2. नितेश राणे यांच्यावर काय टीका झाली?
धर्माच्या नावावर द्वेष पसरवल्याचा आरोप करण्यात आला.
3. अंधारे यांनी कोणता प्रश्न विचारला?
आखातातून तेल घेणे बंद करणार का असा सवाल केला.
4. हा वाद कशामुळे वाढला?
धर्म आणि राजकारण यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपामुळे वाद वाढला.
5. या प्रकरणाचा परिणाम काय होऊ शकतो?
राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.