Sushma Andhare: अशोक खरातच्या कारनाम्याची कल्पना नाही म्हणणाऱ्या चाकणकरांच्या अडचणीत वाढ! अंधारेंनी थेट जुने कागदच दाखवले

Sushma Andhare: स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याला पोलिसांनी महिला अत्याचार प्रकरणी अटक केली आहे. या खरातचे अनेक राजकीय नेते, सेलिब्रेटी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संबंध आहेत.
Rupali Chakankar_Sushma Andhare
Rupali Chakankar_Sushma Andhare
Published on
Updated on

Sushma Andhare: स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याला पोलिसांनी महिला अत्याचार प्रकरणी अटक केली आहे. या खरातचे अनेक राजकीय नेते, सेलिब्रेटी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संबंध आहेत. खरातच्या अटकेनंतर जेव्हा पोलिसांनी त्याची चौकशी केली तेव्हा त्याच्या जवळून अनेक व्हिडिओही पोलिसांनी जप्त केले आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या संस्थेच्या पदाधिकारी असल्याचं समोर आलं आहे.

पण खरातच्या काळ्या कृत्यांची आपल्याला माहिती नव्हती असं चाकणकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं. पण शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक खळबळजनक पुरावा समोर आणला आहे. त्यानुसार, चाकणकर या एक नंबरच्या खोटारड्या असून त्यांना खरातचे सर्व कारनामे माहिती होते असा सनसनाटी आरोप केला आहे. त्यामुळं आता चाकणकर या अडचणीत आल्याचं बोललं जात आहे.

Rupali Chakankar_Sushma Andhare
Sambhaji Nagar ZP: भाजपनं केसानं गळा कापला! विश्वासघात केला, राज्याच्या राजकारणावर याचे परिणाम होणार; अब्दुल सत्तारांचा निर्वाणीचा इशारा

अंधारेंचा आरोप काय?

सुषमा अंधारे यांनी ट्विट करुन यासंदर्भातील पुरावे समोर आणले आहेत. अंधारे म्हणतात, "रूपाली चाकणकर क्रमांक एकच्या खोटारड्या आहेत. कॅप्टन अशोक खरात काय लायकीचा माणूस आहे हे रूपाली चाकणकर यांना चांगलेच माहिती होते. खरात याची दुष्यकृत्ये बाहेर आणण्याचा प्रयत्न 'खबरदार पुढारी' या एका स्थानिक वृत्तपत्राने केला तेव्हा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देत त्याच्याकडून चाकणकर बाईंनी माफीनामा घेतला. ज्या चाकणकर बाई मला या प्रकरणाची माहिती नव्हती असं सांगत आहेत त्या बाई या माफीनाम्याच्या संबंधाने काय बोलणार आहेत? असा सवालही अंधारे यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना आपल्या पक्षाच्या प्रतिमेची फार काळजी असेल तर तटकरेंनी सांगावं, "पीडित महिलांना न्याय देण्याऐवजी महिलांचेच चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या, कधी वैष्णवी हगवणे, कधी तनिषा भिसे तर कधी डॉ. संपदा मुंडे यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करत साततात्याने वादग्रस्त ठरलेल्या चाकणकर यांना महिला आयोगावर ठेवण्यात पक्षाची कोणती राजकीय अपरिहार्यता आहे का? त्यामुळेच 'खबरदार पुढारी'ने दिलेलं हे माफीनामा पत्र बघता रूपाली चाकणकरांना या खरात प्रकरणाची संपूर्ण माहिती एक वर्ष आधीपासूनच होती. मात्र, याच्या मुळाशी जाण्यापेक्षा पीडितांवरच आणि पीडितांना न्याय देणाऱ्यांवरच दबाव आणण्यात चाकणकरांनी धन्यता मानली हे विशेष आहे, असा आरोपही सुषमा अंधारे यांनी केला आहे.

चाकणकरांचं भाष्य काय?

दरम्यान, अशोख खरातच्या संस्थेशी नाव जोडलेलं असल्यानं जेव्हा प्रश्न उपस्थित होऊ लागले त्यावर रुपाली चाकणकर यांनी तातडीनं ट्विट करत स्पष्टीकण दिलं. यात त्यांनी म्हटलं की, "शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचे ट्रस्ट असून काहीवेळा तिथे सामाजिक कार्यक्रम साजरे होतात, त्यामुळे सामाजिक कामांच्या निमित्ताने आम्ही अनेक जण ट्रस्टच्या कामाशी जोडले गेले होतो. ज्यात समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही, आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलिस निष्पक्षपणे चौकशी करतील, पोलिस तपासावर माझा पूर्ण विश्वास आहे"

Rupali Chakankar
Rupali Chakankar

चाकणकरांच्या नावाची चर्चा का?

कॅप्टन अशोक खरात या भोंदूबाबा लैंगिक शोषणाप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातल्या मिरगाव इथं श्री शिवनिका संस्थान, मिरगावच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी कॅप्टन अशोक खरात, उपाध्यक्षपदी राजेंद्र घुमरे, सरचिटणीसपदी नामकर्ण आवारे, सदस्यपदी रुपाली चाकणकर, सुभाषराव गमे, सीए ललित पोफळे हे लोक आहेत. तसंच कॅप्टन अशोक खरात यांच्या भेटीचे फोटो देखील समोर आले आहेत. यावरुन रुपाली चाकणकर या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com