BJP Sarkarnama
कोकण

BJP Politics : भाजपचा मोठा निर्णय: नितेश राणेंना धक्का देत विजयी झालेल्या मायकल डिसोझांसह 13 पदाधिकाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई अखेर मागे

BJP Drops Action Against 13 Suspended Leaders : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या काळात बंडखोरी केलेल्या जिल्ह्यात २३ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर कारवाईचा बडगा भाजपने उगारला होता.

Aslam Shanedivan

Sindhudurg BJP Political News : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या काळात बंडखोरी केलेल्यांसह पक्षशिस्तीचा भंग केलेल्या पदाधिकाऱ्यांना भाजपने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. निलंबित केलेल्या १३ पदाधिकाऱ्यांवरील कारवाई अखेर मागे घेण्यात आली आहे. यात मायकल डिसोझा यांच्यासह काही जिल्हा परिषद व पंचायत समिती अपक्ष सदस्यांचाही समावेश आहे. डिसोझा यांनी पालकमंत्री नितेश राणेंनी दिलेल्या भाजपच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव केला होता. हा निकाल स्थानिक राजकारणात कलाटणी देणारा ठरल्याची चर्चा राज्यभर झाली होती.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या काळात बंडखोरी केलेल्यांसह पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी भाजपच्या निलंबित १३ पदाधिकाऱ्यांवरील कारवाई अखेर मागे घेण्यात आली. यात अपक्ष निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचाही समावेश आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीदरम्यान काही पदाधिकाऱ्यांनी पक्षशिस्तीच्या विरोधात काम केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. मात्र, संबंधित पदाधिकाऱ्यांनी चूक लक्षात आल्याचे नमूद करत पक्षाकडे निलंबन रद्द करण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे या सर्व पदाधिकाऱ्यांना पुन्हा संधी देण्यात आली असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत दिली आहे.

सावंतवाडी येथे पार पडलेल्या भाजपच्या जिल्हा विस्तार कार्यकारिणीची बैठकीनंतर शिस्तभंग समितीच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला. यानंतरच सावंत यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले या तीन विधानसभा मतदारसंघांतील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.

त्यावेळी भाजपने २३ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर कारवाईचा बडगा उगारत ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले होते. ज्यात मायकल डिसोझांसह राजेंद्र म्हापसेकर, शर्वाणी गावंकर, रुपेश पावसकर आणि योगेश तावडें सारख्या प्रमुख नावांचा समावेश होते. या कारवाईनंतरही मायकल डिसोझा यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढत विजयी झाले होते.

डिसोझा यांनी भाजपचे नेते नितेश राणे यांनी दिलेल्या भाजपचे अधिकृत उमेदवार महेश सारंग यांचा पराभव केला आहे. हा निकाल स्थानिक राजकारणात कलाटणी देणारा ठरणार अशी चर्चा राज्यभर झाली होती. यानंतर आता राज्यातील ग्रामपंचायचींच्या निवडणुकींच्या धुरळा उडणार असून त्याआधीच भाजपने आपला निर्णय मागे घेतला आहे.

निलंबन रद्द केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये कोलगाव जिल्हा परिषद सदस्य डायगो (मायकल) फ्रान्सिस डिसोजा, इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन एकनाथ राऊळ आणि माजगाव पंचायत समिती सदस्य जितेंद्र पांडुरंग गावकर यांचा समावेश आहे. तसेच सुजाता अजित पडवळ, शर्वाणी शेखर गावकर, स्वागत रघुवीर नाटेकर, योगेश अशोक केणी, उल्हास उत्तम परब, स्नेहल संदीप नेमळेकर, साक्षी संदीप नाईक, सुप्रिया शैलेश नाईक, प्रवीण नारायण गवस आणि अनिरुद्ध फाटक यांचे देखील निलंबन मागे घेण्यात आले आहे.

या निर्णयानंतर या सर्व पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात काम करण्याची पुन्हा संधी मिळाली असून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा भाजपचे संघटन अधिक मजबूत होणार आहे. दरम्यान निलंबन मागे घेण्यात आलेले सर्व पदाधिकारी पुन्हा सक्रियपणे पक्षाच्या कामात सहभागी होतील, असा विश्वास जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT