BJP Politics : आजारावर मात, भाजपचा उत्तर महाराष्ट्रातील बडा नेता 8 महिन्यांनी पुन्हा मैदानात

Vijaykumar Gavit comeback : आजाराशी झुंज देत, आजारावर मात करत माजी मंत्री व भाजप आमदार विजयकुमार गावित आठ महिन्यानंतर पुन्हा नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत.
BJP
BJP Sarkarnama
Published on
Updated on

Nandurbar BJP Politics : आजाराशी झुंज दिल्यानंतर माजी आदिवासी विकास मंत्री व भाजपचे आमदार डॉ. विजयकुमार गावित आठ महिन्यानंतर पुन्हा जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. मुंबईतून जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून त्यांनी जनसंपर्क सुरू केला. आजारपणावर मात करत त्यांनी पुन्हा एकदा सूत्रे आता आपल्या हाती घेतली आहे.

नुकतेच नंदुरबार शहरातील एका हॉटेलमध्ये पार पडलेल्या मेळाव्यात गावितांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आजारपणावर मात करत पुन्हा मैदानात उतरलेल्या आपल्या नेत्याचा आठ महिन्यांनंतर प्रथमच आवाज ऐकल्याने उपस्थितांना गहिवरून आले होते. अनेकांच्या डोळ्यांत पाणी आल्याने सभागृहातील वातावरण भावनिक झाले होते. नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण आढावा बैठकीत घेण्यात आला.

यावेळी मतदानापासून एकही मतदार वंचित राहू नये, तसेच दुबार नोंदणी टाळण्यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. डॉ. गावित पुन्हा सक्रियपणे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिसल्याने उपस्थित कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

BJP
Vijaykumar Gavit: भाजपच्या माजी मंत्र्यांची शिवसेना-काँग्रेसच्या नेत्यांवर आगपाखड; कुठल्याही पुढाऱ्याने एकही योजना दिली नाही....

डॉ. विजयकुमार गावित हे नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे नेते आहेत. नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात गावित कुटुंबाचा नेहमीच बोलबाला राहिला आहे. गावित कुटुंबाचे प्रमुख असलेले विजय कुमार गावित हे तब्बल १९९५ पासून नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून विजयी होत आले आहेत. अनेक वर्ष ते मंत्रिमंडळात मंत्री देखील राहिले. त्यांनी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यात भाजपचं एक वलय निर्माण केलं.

त्यातूनच पुढे त्याची मुलगी डॉ. हिना गावित याही राजकारणात सक्रीय झाल्या. त्या दोन वेळा नंदुरबारच्या खासदार राहिल्या आहेत. तिसऱ्यांदा २०२४ मध्ये मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसचे गोवाल पाडवी यांनी त्यांचा पराभव केला. तसेच विजय कुमार गावित यांनाही त्यानंतर मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. त्यामुळे नंदुरबारच्या राजकारणात गावित कुटुंब काहीसे बॅकफूटवर आले.

BJP
Nashik Guardian Minister : मोठी बातमी, नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजनांची नियुक्ती; राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा, भुजबळ-भुसेंना डच्चू

नंदुरबारमधील राजकीय समीकरण पाहाता तिथे महायुतीमधील भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांमध्येच तीव्र संघर्ष आहे. विजयकुमार गावित एका बाजूला आणि त्यांचे सगळे विरोधक एका बाजूला असे चित्र आहे. त्यातूनच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत गावितांनी शिवसेनेसोबत युती न करता स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. नंदुरबारमध्ये शिवसेनेची वाढती ताकद ही गावित यांच्या समोरील मोठे आव्हान आहे. पक्षांतर्गत, महायुतीमधील व बाहेरील अशा विरोधकांचा सामना त्यांना करावा लागत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com