Akhil Chitre on Nitesh Rane Sarkarnama
कोकण

Nitesh Rane Fund Controversy : राणेंचं मंत्रिपद धोक्यात? राज्यपाल कारवाई करणार? ठाकरेंच्या शिलेदारानं 'पिच्छा' पुरवण्याचं ठरवलं

Demand to remove Nitesh Rane from cabinet for fund blocking statement: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत निधी रोखण्याच्या विधानावर भाजप मंत्री नीतेश राणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Pradeep Pendhare

Sindhudurg BJP minister: सिधुंदुर्ग जिल्ह्याचे भाजपचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या अडचणी वाढणार आहे. मंत्रीपद धोक्यात येण्याची चिन्हं आहे. कारणही तसंच घडलं आहे. मंत्री राणे यांनी निवडणुकीत केलेल्या विधानामुळे त्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या संचार सेनेचे अध्यक्ष अखिल चित्रे यांनी याबाबत राज्यपालांकडे तक्रार केली आहे. राज्यपालक या तक्रारीवर काय निर्णय घेतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.

शिवसेनायुबीटीचे (Uddhav Thackeray) अखिल चित्रे यांनी मंत्री राणेंविषयी राज्यपालांकडे तक्रार करताना म्हटले आहे की, "मंत्री राणे संविधानिक पदावर आहेत. त्यांनी जाहीरपणे, आम्हाला ग्रामपंचायत द्या, नाहीतर एक रुपयाचाही निधी मिळणार नाही. त्यामुळे सगळे सरपंच आमचे झाले. कमळ किंवा धनुष्यबाण चिन्हं दिसलं की, लगेच निधी देतो. पण मशाल चिन्ह निघालं, तर असलेला निधी कमी करतो."

'भाजप (BJP) मंत्री राणे यांचे हे विधान राजकीय नसू, सावर्जनिक पदाचा वापर करून, स्थानिक स्वराज्य संस्थांवर आर्थिक दबाव टाकल्याची उघड कुबली आहे. मंत्रि‍पदाच्या, लोकप्रतिनिधीच्या शपथेचा भंग आहे,' याकडे राज्यपालांचे अखिल चित्रे यांनी लक्ष वेधलं आहे.

'भारतीय संविधानाच्या तिसऱ्या अनुसूचीप्रमाणे प्रत्येक मंत्री व लोकप्रतिनिधी शपथ घेतो की तो, संविधानाची निष्ठा राखेल, कोणताही पक्षपात न करता कर्तव्य पार पाडेल, पदाचा वापर लोकहितासाठी करेल. परंतु वरील विधानांपासून स्पष्ट होते की, संबंधित मंत्र्याने सरकारी निधीचा वापर पक्ष, चिन्हं, व राजकीय निष्ठेनुसार करण्याची भूमिका घेतली, लोकांनी निवडून दिलेल्या स्थानिक प्रतिनिधींना आर्थिक धमकीद्वारे निष्ठा बदलण्यास भाग पाडले आणि त्यामुळे मंत्रि‍पदाच्या तसेच लोकप्रतिनिधीच्या पदाच्या शपथेचा उघडपणे भंग झाला आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारांचा भंग असून, उघडपणे मंत्रि‍पदाच्या पवित्रतेचा धक्का देणारे आहे,' असे अखिल चित्रे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

याशिवाय, अखिल चित्रे यांनी तक्रारीत राज्यपाल यांचे गंभीरबाबीकडे लक्ष वेधले. मंत्री राणे यांची ही विधाने, पहिल्यादाच नसून यापूर्वी देखील केले आहेत, याकडे लक्ष वेधले. मंत्रि‍पदाचा वापर, राणे यांनी यापूर्वी केलेला आहे. यात भाषा, वागणूक आणि सत्तेचा वापर केल्याचे प्रसंग सार्वजनिकरित्या समोर आलेले आहे. याचा संदर्भ राज्यपालांना देताना, मंत्री राणे यांच्याविरोधात करण्यात आलेले 13 मार्च 2025 च्या तक्रारीचा संदर्भ देखील अखिल चित्रे यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT