BJP  Sarkarnama
कोकण

BJP Setback : कोकणात भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविकेचा तडाफडकी राजीनामा : नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

Sindhudurg BJP : कोकणात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका संध्या तेरसे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

Aslam Shanedivan

Sindhudurg Political News : भाजपला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. कुडाळ नगरपंचायतमधील सत्ताधारी भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका संध्या प्रसाद तेरसे यांनी आपल्या नगरसेवकपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांवर गैरकारभाराचे आरोप करत त्यांनी आपला राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. त्या प्रभाग क्र. १२ मधून विद्यमान नगरसेविकाही आहेत.

संध्या तेरसे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्याधिकाऱ्यांच्या गैरकारभाराविरोधात मागणीपत्र दिले होते. त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने १० जुलै रोजी उपोषण केले. त्यानंतरही उत्तर न मिळाले नाही. १० जुलै रोजी तेरसे यांनी नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांच्या गैरकारभाराबाबत कारवाई करण्याच्या मागणीचे पत्र पुन्हा दिले. मात्र, त्यावरही उत्तर मिळाले नाही, असा आरोप त्यांनी केला.

विशेष सभेत महत्त्वाच्या विषयावर ठराव मांडूनही मतदान घेतले जात नाही. मुख्याधिकारी सांगतात की, ठराव मतदानासाठी घ्यायचा की नाही, हा अधिकार फक्त सभाध्यक्षांचा आहे. त्यामुळे सभेत नगरसेवक कशाला हवेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नगरपंचायत प्रशासनाकडून सुरू असलेल्या मनमानी कारभाराला साथ देण्यासारखे होईल म्हणून मी राजीनामा देत आहे, असे पत्रात नमूद केले आहे.

काय होता वाद?

कुडाळ नगरपंचायतीच्या हिंदु कॉलनी येथील १४१ गुंठे जमीन नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नगरपंचायतीच्या ताब्यातून गेली, असा आरोप तेरसे यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी 10 जुलैला नगरपंचायतीसमोर उपोषणही केले होते. तर ही जागा परत मिळण्यासाठी त्यांनी आक्रमकपणे लढा उभारला होता.

तेरसे यांच्या या लढ्याला कुडाळमधील सर्वच राजकीय पक्षांनी पाठींबा दिला होता. याबाबत त्यांनी आक्रमकपणे नगरपंचायतीच्या विशेष सभेतही आवाज उठवला होता. तसेच या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र या जमीन गैरव्यवहारात प्रशासनाकडून कोणतीच कारवाई झाली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT