

Kolhapur Mahapalika : कोल्हापूर महानगरपालिकेत सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या नगरसेवकाचे जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील ओबीसी प्रवर्गातून विजयी झालेले विजयसिंह उर्फ रिंकू वसंतराव देसाई यांचा जात पडताळणीचा दाखला अवैध ठरवण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जात पडताळणी समितीकडून देण्यात आले आहे. भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे.
कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 9 मधून विजयसिंह ऊर्फ रिंकू देसाई हे भाजपकडून ओबीसी प्रवर्गातून निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार नंदकुमार पिसे व अपक्ष उमेदवार सचिन सुतार होते. यात देसाई यांना 12,902 इतकी मते होती. तर अपक्ष उमेदवार सचिन सुतार यांना 373 आणि काँग्रेसचे उमेदवार नंदकुमार पिसे यांना 5,476 इतकी मते मिळाली होती. देसाई यांचा 7,429 इतक्या मताधिक्याने विजय झाला होता.
दरम्यान, देसाई यांच्या जात वैधता प्रमाणपत्रावर नंदकुमार पिसे यांनी हरकत घेतली होती. त्यावर देसाई यांचा जातीचा दाखला अवैध ठरवण्यात आला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत भाजपला खास करून दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांच्यासाठी हा धक्का समजला जातो.
कोल्हापूर महानगरपालिकेत देसाई हे सर्वात चर्चेत राहिलेले नगरसेवक आहेत. काँग्रेस नेते, आमदार सतेज पाटील आणि तत्कालीन काँग्रेसचे गटनेते आणि आत्ताचे शिवसेनेचे नेते शारंगधर देशमुख यांच्या प्रभागातील लढाई ही प्रतिष्ठेची होती. त्याच प्रभागातून देसाई निवडून आले होते.
दरम्यान याबाबत विजयसिंह देसाई यांच्याशी संपर्क साधला असता, कोणत्या कागदपत्राच्या आधारे माझा ओबीसी दाखला अवैध करण्यात आला याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. याबाबत लवकरच उच्च न्यायालयात धाव घेऊन दाद मागणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.