Narayan Rane Vs Kiran Samant, Uday Samant Sarkarnama
कोकण

Rane Vs Samant : कोकणात पोस्टर वॉर पेटलं! 'वक्त आने दो, जबाब भी देंगे'ला राणेंच्या कार्यकर्त्यांचं जशास तसं उत्तर...

Narayan Rane Vs Kiran Samant, Uday Samant : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राणे आणि सामंत यांच्यातील वाद समोर आला. नितेश राणे यांनी थेट किरण सामंत यांनी आपलं काम न केल्याचा आरोप केला होता. या आरोपांना शिंदे गटाने उत्तर दिलं होतं.

Jagdish Patil

Sindhudurg News, 16 June : 'बाप बाप होता है' अशा आशयाचा बॅनर कणकवलीत लागला आहे. या बॅनवर नारायण राणे यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या बॅनरला राणे स्टाईलने उत्तर देण्याचा बॅनरमधून प्रयत्न केल्याचं दिसत आहे. कणकवली शिवाजी चौकात सुरू झालेले हे बॅनर वॉर आता कणकवलीच्या मेन नाक्यावरील पटवर्धन चौकापर्यंत पोहोचलं आहे.

कारण आता अशाच आशयाचा आणखी एक बॅनर रत्नागिरीतही लावण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे सामंत बंधू आणि नारायण राणे यांच्यातील हे बॅनर वॉर कधीपर्यंत चालणार हे पाहणं महत्वाच ठरणार आहे. शिंदे गटाचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत याचा फोटो असलेले बॅनर कणकवलीतील शिवसेना शाखेबाहेर लावण्यात आला आहे.

या बॅनरवर 'वक्त आने दो, जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे' असं लिहिलं आहे. हा बॅनरमधून नेमका कोणाला इशारा दिला आहे, याबाबत चर्चा सुरु असतानाच आता नारायण राणेंचा (Narayan Rane) फोटो असलेले बॅनर लावण्यात आले आहेत. ज्यावर 'बाप बाप होता है' तसेच झुंड मे तो कुत्ते आते है, शेअर अकेला आता है, असं लिहिलं आहे.

त्यामुळे हा वाद राणे विरुद्ध सामंत असाच असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राणे आणि सामंत यांच्यातील वाद समोर आला. निलेश राणे (Nilesh Rane) यांनी थेट किरण सामंत यांनी आपलं काम न केल्याचा आरोप केला होता. या आरोपांना शिंदे गटाने उत्तर दिलं होतं.

मात्र आता पुन्हा एकदा सामंत बंधू गट आणि राणे यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आल्याचं दिसत आहे. शिवाय आता हे बॅनर वॉर असंच सुरु राहणार की, दोन्ही बाजूचे नेते आपल्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन करणार पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT