Video OBC Reservation : "मराठा समाज फक्त 10 टक्के, OBC आरक्षणाला विरोध कराल, तर चुन-चुन के...", शिंदे सरकारला कुणी दिला इशारा?

Prakash Shendage On Shinde Govt : "जो ओबीसी हित की बात करेगा वही राज करेगा, असा निर्णय आम्ही घेतला आहे," असंही प्रकाश शेंडगेंनी म्हटलं आहे.
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama

जो ओबीसी आरक्षणाला विरोध करेल आणि सगेसोयऱ्याचा जीआर काढेल, त्यांचे आमदार आम्ही चुन-चुन के गिराएंगे, असा इशारा ओबीसी नेते, प्रकाश शेंडगे यांनी शिंदे सरकारला दिला आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, म्हणून वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

या उपोषणाला प्रकाश शेंडगे यांनी भेट दिली. यावेळी ओबीसी उपोषणाचा ( Obc Reservation ) वणवा राज्यभर पेटणार आहे. त्यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर जबाबदारी सरकारची असेल, असंही शेंडगेंनी म्हटलं. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

प्रकाश शेंडगे ( Prakash Shendage ) म्हणाले, "जरांगे-पाटलांच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणावर हल्लाबोल झाला. त्याचा निषेध म्हणून आम्ही उपोषण सुरू केलं आहे. कुणब्यांचे दाखले देण्याचा जीआर सरकारनं रद्द करत सगेसोयऱ्याची अधिसूचना मागे घेतली पाहिजे. सरकारनं ही कार्यवाही करावी. अन्यथा उपोषणाचा वणवा राज्यात पेटल्याशिवाय राहणार नाही."

"80 टक्के मराठे ओबीसी आरक्षणात घुसवल्याचं जरांगे-पाटलांनी म्हटलं आहे. त्याबद्दल सरकारकडून स्पष्टीकरण आलेलं नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का लागला असेल, तर सरकारनं माफी मागितली पाहिजे. बीड जिल्ह्यात 80 हजार कुणब्यांचे दाखले देण्यात आले," असं शेंडगेंनी सांगितलं.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Tanaji Sawant Meet Jarangae Patil : तानाजी सावंत, अंबादास दानवेंचे 'या' विषयावर झाले एकमत; मुख्यमंत्र्यांशी बोलले...

"जरांगे-पाटलांच्या उपोषणस्थळी मंत्र्यांची लाईन लागली. पण, ओबीसी आंदोलनाची दखल घेण्यासाठी सरकारचा एकही मंत्री का आला नाही? जो ओबीसी आरक्षणाला विरोध करेल आणि सगेसोयऱ्याचा जीआर काढेल, त्यांचे आमदार चुन-चुन के गिराएंगे... हम छोडेंगे नही," असा इशारा शेंडगेंनी दिला आहे.

"जो ओबीसी हित की बात करेगा वही राज करेगा, असा निर्णय आम्ही घेतला आहे. विधानसभेचा रणसंग्राम जवळ आला आहे. आमच्या नादाला कुणी लागू नये. आम्ही मराठा आरक्षणाला विरोध केला नाही. सरकारनं मराठा समाजाला 10 टक्के दिलेल्या आरक्षणाला आम्ही पाठिंबा दिला आहे. तरी सगेसोयरे, कुणब्यांचे दाखले देणार, 'ईडब्लूएस'मधून सुद्धा सुद्धा मराठ्यांना आरक्षण देणार, मग ओबीसींच्या मुलांनी काय करायचं?" असा सवाल शेंडगेंनी उपस्थित केला आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Manoj Jarange : गावानं साथ दिली अन् त्रासही सहन केला; मनोज जरांगे भावूक

"ओबीसी समाज 60 टक्के आहे. तर, मराठा समाज 10 ते 12 टक्के आहे. दलित आणि मुस्लिम समाज एकत्र आले, तर आम्ही 80 टक्के होतो. त्यामुळे ओबीसींशी पंगा घेणं कुणालाही परवडणारे नाही," अशा शब्दांत शेंडगेंनी ठणकावून सांगितलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com