Election officials verify duplicate voters ahead of Zilla Parishad elections. Sarkarnama
कोकण

Sindhudurg ZP Election Winner List : मतदारांनी दिला धक्का की साथ? सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत कोण जिंकले-हरले… पाहा नावानिशी यादी

Sindhudurg Zilla Parishad and Panchayat Samiti Election Results : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.

Aslam Shanedivan

  • सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये महायुतीचे बहुमत स्पष्ट झाले असून सत्ता निश्चित मानली जात आहे.

  • मात्र भाजपमधून बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवारांनी सहा जागांवर भाजप व शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांचा पराभव केला आहे.

  • या पराभवामुळे भाजप नेते अस्वस्थ झाले असून पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेतून थेट इशारा दिला आहे.

Sindhudurg News : सिंधुदुर्गात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे निकाल समोर येत असून महायुतीचे बहुमत दिसत आहे. याआधीच जिल्हा परिषदेच्या आठ जागा आणि पंचायत समितीच्या १८ जागा बिनविरोध झाल्याने महायुती सत्तेत बसणार हे निश्चित आहे. पण या निकालात भाजपला धक्का देणारे तब्बल सहा निकाल लागले असून भाजपमधून बंडखोरी केलेल्या अपक्षांनी बाजी मारत भाजप आणि शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना पराभवाची धूळ चारली आहे. यामुळे भाजप नेत्यांच्या हा पराभव जिव्हारी लागला असून पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेतच थेट इशारा दिला आहे. पण महायुतीने कणकवली आणि कुडाळ विधानसभा मतदार संघात वर्चस्व ठेवले आहे.

मात्र सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपमधून बंडखोरी केलेले तब्बल सहा उमेदवार महायुतीला धोकादायक ठरले. महायुतीच्या बंडखोरांनी शिवसेनेचे अधिकृत चार ठिकाणी पराभूत केले असून भाजपचे अधिकृत दोन उमेदवार देखील पराभूत केले आहेत. शिवसेनेला सुटलेल्या आंबोली मतदार संघात भाजपचा अधिकृत उमेदवार विजयी झाला आहे.

तर संजय पडते, समिधा नाईक या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच दीपलक्ष्मी पडते, सुमेधा पाताडे या माजी अध्यक्षांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. या अपक्षांच्या विजयामुळे भाजप शिवसेना युतीला मोठ्या प्रमाणात छेद मिळाला आहे. तर नेतृत्व करणाऱ्या खासदार नारायण राणे, पालकमंत्री नीतेश राणे, माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे.

महायुतीच्या बिनविरोध विजयी उमेदवारांची यादी

जिल्हा परिषद बिनविरोध उमेदवार

१) खारेपाटण जिल्हा परिषद प्राची इस्वालकर (भाजप)

२) बांदा जिल्हा परिषद प्रमोद कामत (भाजप)

३) जाणवली जिल्हा परिषद रुहिता तांबे (शिंदे शिवसेना)

४) पडेल जिल्हा परिषद सुयोगी घाडी (भाजप)

५) बापर्डे जिल्हा परिषद अवनी तेली (भाजप)

६) पोंगुर्ले जिल्हा परिषद अनुराधा नारकर (भाजप)

७) किंजवडे जिल्हा परिषद सावी लोके (भाजप)

८) कोळपे जिल्हा परिषद प्रमोद रावराणे (भाजप)

कणकवली पंचायत समिती बिनविरोध उमेदवार

१) वरवडे पंचायत समिती सोनू सावंत (भाजपा)

२) नांदगाव पंचायत समिती हर्षदा वाळके (भाजप)

३) जाणवली पंचायत समिती महेश्वरी चव्हाण (भाजप)

४) बिडवाडी पंचायत समिती संजना राणे (भाजप)

५) हरकुळ बुद्रुक पंचायत समिती दिव्या पेडणेकर (भाजप)

६) नाटळ पंचायत समिती सायली कृपाळ (भाजप)

देवगड पंचायत समिती बिनविरोध उमेदवार

७) पडेल पंचायत समिती अंकुश ठूकरूल (भाजप)

८) नाडण पंचायत समिती गणेश राणे (भाजप)

९) बापर्डे पंचायत समिती संजना लाड (भाजप)

१०) फणसगाव पंचायत समिती समृद्धी चव्हाण (भाजप)

११) शिरगाव पंचायत समिती शितल तावडे (भाजप)

१२) कोटकामते पंचायत समिती ऋतुजा खाजनवाडकर (भाजप)

वैभववाडी पंचायत समिती बिनविरोध उमेदवार

१३) कोकिसरे पंचायत समिती सौ.साधना नकाशे (भाजप)

वेंगुर्ले पंचायत समिती बिनविरोध उमेदवार

१४) आसोली पंचायत समिती संकेत धुरी (भाजप)

मालवण पंचायत समिती बिनविरोध उमेदवार

१५) आडवली मालडी पंचायत समिती सीमा परुळेकर (भाजप)

सावंतवाडी पंचायत समिती बिनविरोध उमेदवार

१६) शेर्ले पंचायत समिती महेश धुरी (भाजप)

दोडामार्ग पंचायत समिती बिनविरोध उमेदवार

१७) कोलझर पंचायत समिती गणेशप्रसाद गवस (शिंदे शिवसेना)

FAQs :

1. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत सत्ता कोणाची?
महायुतीचे बहुमत असून ती सत्तेत बसणार हे निश्चित झाले आहे.

2. किती जागा बिनविरोध झाल्या होत्या?
जिल्हा परिषदेच्या ८ आणि पंचायत समितीच्या १८ जागा बिनविरोध झाल्या होत्या.

3. भाजपला नेमका धक्का कशामुळे बसला?
भाजपमधून बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवारांनी सहा जागांवर विजय मिळवला.

4. नितेश राणेंनी काय प्रतिक्रिया दिली?
पराभव जिव्हारी लागल्याने त्यांनी पत्रकार परिषदेत थेट इशारा दिला.

5. कोणत्या मतदारसंघात महायुतीचे वर्चस्व कायम राहिले?
कणकवली आणि कुडाळ विधानसभा मतदारसंघात महायुतीचे वर्चस्व दिसून आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT