सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने सलग दोन उमेदवार बिनविरोध निवडून आणले आहेत.
अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपचा बिनविरोध विजय शक्य झाला आहे.
बिनविरोध निवडणुकांमुळे विरोधकांकडून भाजपवर लोकशाही संपवण्याचा आरोप होत आहे.
Sindhudurg News : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूका जाहीर झाल्या असून महायुतीत जागा वाटपावरून घोळ दिसून येत आहे. अशातच कोकणातील रत्नागिरी आणि तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला निवडणुकीच्या आधीच गुलाल लागला होता. कणकवली पंचायत समितीच्या बिडवाडी मतदार संघात ठाकरे गटाच्या उमेदवार विद्या शिंदे यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. यामुळे भाजपच्या उमेदवार संजना राणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या बिनविरोध निवडीमुळे राज्यात भाजपचा पहिला विजय कोकणात नोंदवला गेला. तोच आता जिल्ह्यात भाजपचे दोन उमेदवनार बिनविरोध झाले आहेत. यामुळे विजयाचा आकडा तीनवर गेला असून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही भाजपचा बिनविरोध निवडणुकांचा पॅटर्न पाहायला मिळत असल्याची चर्चा रंगली आहे.
राज्यात एकीकडे पार पडलेल्या नरग पालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीत भाजपने जागा सर्वाधिक जागा बिनविरोध जिंकल्या होता. त्या पाठोपाठ झालेल्या महापालिका निवडणुकीत देखील भाजपने आपला वरचष्मा ठेवत मोठा पक्ष बनला. महापालिका निवडणुकीत राज्यात जवळपास 70 बिनविरोध नगरसेवक निवडून आले होते. त्यामध्ये सर्वांधिक भाजपचे, त्याखालोखाल शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक बिनविरोध होते.
यामुळे विरोधकांकडून भाजपवर जोरदार टीका झाली होती. तसेच भाजपचा लोकशाही अन् निवडणूक प्रक्रियाच संपवायची असल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. मनसेनं तर या बिनविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ज्यानंतर राज्यभर खळबळ उडाली होती. मात्र न्यायालयाने ही याचिकाच निकाली काढल्याने विरोधकांच्या आरोपाची हवा गेली होती.
यानंतर आता होऊ घातलेल्या राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये देखील बिनविरोध निवडणुकांचा पॅटर्न दिसत आहे. तळकोकणात भाजपने एक नाही तर विजयाची हॅट्ट्रिक मारली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन उमेदवार बिनविरोध झाले आहेत. कणकवली पंचायत समितीच्या बिडवाडी मतदार संघात ठाकरे गटाच्या उमेदवार विद्या शिंदे यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. यामुळे भाजपच्या उमेदवार संजना राणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. राणे यांच्या माध्यमातून पहिली निवड बिनविरोध झाली.
यानंतर येथील खारेपाठण जिल्हा परिषदेच्या उमेदवार प्राची इस्वालकर यांच्या माध्यमातून दुसरी निवड बिनविरोध झाली असून पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्याने येथे भाजपचा उमेदवार बिनविरोध झाला.
या आता पाठोपाठ बांदा जिल्हा परिषदेतून भाजपचे उमेदवार तथा माजी सभापती प्रमोद कामत यांची देखील बिनविरोध निवड झाल्याने भाजपने विजयाची विजयाची हॅट्ट्रिक मारल्याचे बोलले जात आहे. येथील जिल्हा परिषदेच्या बांदा गटातून अपक्ष उमेदवार सुशांत पांगम यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. यामुळे भाजपचे उमेदवार तथा माजी सभापती प्रमोद कामत हे बिनविरोध निवडून आले आहेत. काम यांच्या विजयाने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपने दुसरा विजय बिनविरोध मिळवल्याचे पाहायला मिळत आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम :
राज्यातील ५० टक्क्यांच्या आत आरक्षण मर्यादा न ओलांडणाऱ्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आता संपली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 5 फेब्रुवारीला मतदान होईल. तर 7 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे.
FAQs :
1) सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे किती उमेदवार बिनविरोध झाले?
👉 आतापर्यंत दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
2) बिनविरोध निवडणुकीचा भाजपला फायदा कसा झाला?
👉 अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपला बिनविरोध विजय मिळाला.
3) विरोधकांचा भाजपवर काय आरोप आहे?
👉 भाजप लोकशाही प्रक्रिया कमजोर करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.
4) पंचायत समिती निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
👉 भाजपची ताकद वाढल्याने पंचायत समिती निवडणुकांमध्येही प्रभाव पडण्याची शक्यता आहे.
5) पुढील राजकीय चित्र कसे असू शकते?
👉 सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.