Anil Parab  sarkarnama
कोकण

अनिल परबांसाठी कडक सुरक्षा व्यवस्था

परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) हे रत्नागिरी दौऱ्यावर गेले आहेत.

सरकारनामा ब्यूरो

रत्नागिरी : गेल्या महिन्याभरापासून राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांकडून (ST Workers Strike) एसटीला शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) हे रत्नागिरी दौऱ्यावर गेले. मात्र, त्यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांचा चांगलाच धसका घेतला असून त्याच्या सुरक्षेत कमालीची वाढ करण्यात आली आहे. बुधवारी (ता.15 डिसेंबर) रात्रीपासून परबांचा मुक्काम असलेल्या शासकीय विश्रामगृहाला मात्र, पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.

जवळपास महिना लोटला तरी, एसटी कर्मचार्‍यांच्या संपावर अजूनही ठोस तोडगा निघालेला नाही. परब यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करूनही विलिनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम आहेत. त्यामुळे राज्यातील इतर आगाराप्रमाणे रत्नागिरी आगरातही एसटी सेवा पूर्ण ठप्प आहे. एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरू आहे. अशातच बुधवारी जिल्हा दौर्‍यावर आलेले परबांच्या गाड्याचा ताफा आंदोलना समोरुनच जाणार असल्याने बुधवार आणि गुरुवारी दिवसभर त्यांना पोलिसाचा गराडा कायम होता. बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास परब यांचा ताफा एसटी कर्मचारी आंदोलन स्थळाजवळून जाणार असल्याने पोलिसांनी आंदोलनासह शासकीय विश्रामगृहाजवळ कडक बंदोबस्त ठेवला होता.

शासकीय विश्रामगृहात तर, तपासणी करूनच आत सोडण्यात येत होते. परिवहन मंत्र्यांनी मुक्काम केलेल्या कक्षाबाहेरही बंदोबस्त वाढविण्यात आला होता. यापूर्वीच्या दौर्‍यात रात्रीच्या वेळी तीन कर्मचार्‍यांचे गार्ड तैनात केले होते. आता तीन अधिकार्‍यांसह 20 कर्मचारी विविध ठिकाणी नियुक्त करण्यात आले होते. बुधवारी रात्री प्रथमच बंदोबस्तात मोठी वाढ झाल्याने पालकमंत्र्यांनी एसटी कर्मचार्‍यांचा धसका घेतल्याची चर्चा परिसरात सुरु होती. गुरुवारी (ता.16 डिसेंबर) दिवसभर शासकीय बैठका, कार्यक्रम याठिकाणीही नेहमीपेक्षा अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT