Parth Pawar Devendra Fadnavis meeting controversy Sarkarnama
कोकण

Sunil Tatkare on Parth Pawar Meeting : पार्थ पवार-देवेंद्र फडणवीस भेटीवरून चर्चांना उधाण; 'वावगं वाटण्याचं कारण नाही', सुनील तटकरे यांचं सूचक विधान

Sunil Tatkare reaction to Parth Pawar Fadnavis meeting: फडणवीसांच्या भेटींवरून राष्ट्रवादीत संशयाच्या चर्चा; अर्थ खात्यावरही तटकरे यांचे मोठे स्पष्टीकरण, शरद पवार राष्ट्रवादीबाबतही स्पष्ट भूमिका

Pradeep Pendhare

Ajit Pawar NCP News : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाठीभेटीवरून संशयाची राळ उठली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर, युवा नेते पार्थ पवार यांनी देखील त्यांची भेट घेतली.

या भेटीवर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पार्थ पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीवर प्रतिक्रिया सूचक विधान केले. प्रशासकीयसह संघटनेच्या कामकाजाबाबत त्यांनी चर्चा केली असली तरी वेगळे वाटण्याचे कारण नाही, असे प्रदेशाध्यक्ष खासदार तटकरे यांनी म्हटले आहे.

सुनील तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले, "या भेटी पाठीमागचे कारण मला काही माहिती नाही. परंतु पार्थ पवार युवा नेते आहेत. संघटनेचे काम करत आहेत. राज्यसभेत पक्षाकडून प्रतिनिधित्व करत आहेत. त्याच्यामुळे ते भेटू शकतात. त्यात वावगं वाटण्याचं काही कारण नाही. प्रशासकीयसह संघटनेच्या कामकाजाबाबत देखील त्यांनी चर्चा केली तर वेगळं वाटण्याचं काही कारण नाही."

अजित पवार राष्ट्रवादीचे (NCP) अर्थ खाते दिले जाऊ नये म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत प्रयत्नशील आहेत, यावर बोलताना सुनील तटकरे यांनी हे वृत्त निराधार असल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहिलेले आहेत.

आता ते उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी त्यांचे कर्तृत्व सिद्ध केलेले आहे. अशावेळी ते एखाद्या पक्षाला विशिष्ट विभाग किंवा खाते जाऊ नये यासाठी ते प्रयत्न करत असतील असे वाटत नाही, असे म्हटले.

मित्र पक्षाला काय मिळावं आणि काय मिळू नये, हे गेल्या तीन वर्षात त्यांच्याकडून मी ऐकले नाही. अजित पवार राष्ट्रवादी बरोबर त्यांच्या संबंध उत्तम आहेत. अजितदादा असताना होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

अर्थ खाते मिळण्यासाठी लवकर मुख्यमंत्र्यांशी चर्चा

अर्थ खाते मिळावे यासाठी आमची मागणी आहेच. पक्षाच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची कोर कमिटी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यावर चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर इतर मुद्द्यांवरही चर्चा होईल, असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

जयंत पाटील यांच्या भेटीवर तटकरे म्हणाले...

जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. जवळपास एक तास ही भेट झाली. यावर सुनील तटकरे यांनी, या भेटी पाठीमागे वेगळं असं राजकीय समीकरण दिसत नाहीत. जयंत पाटील हे मुरब्बी नेते आहेत. सात वेळा विधिमंडळावर ते निवडून गेलेले आहेत. ते वेगवेगळ्या मुद्द्यांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात. त्यात काही वेगळं आहे, असे वाटत नाही. तो त्यांचा अधिकार आहे, असे स्पष्ट केले.

शरद पवार सत्तेत सहभागी होण्याची फक्त चर्चा

शरद पवार राष्ट्रवादी हा महायुती बरोबर सत्तेत सहभागी होईल, अशा राज्यात चर्चा आहे. यावर सुनील तटकरे म्हणाले, "या संदर्भात मला काही माहिती नाही. गेली साठ वर्षापासून राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये शरद पवार साहेबांची भूमिका राहिली आहे. ते वरिष्ठ नेते आहेत. देशाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाने कोणाबरोबर जावा हा त्यांचा आणि त्याच्या पक्षाचा अधिकार आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT