Raigad Shivsena Vs NCP Politics Sarkarnama
कोकण

Raigad Shivsena Vs NCP Politics : 'विश्वासघाताची किंमत चुकवावी लागले'; एकनाथ शिंदेंचा शिलेदार राष्ट्रवादीत तटकरेंबरोबर येताच शिवसेनेवर गुरगुरला!

Former Shiv Sena leader Manojkumar Shinde joins NCP in Raigad : एकनाथ शिंदे शिवसेनेचे रोहा तालुक्याचे माजी तालुकाप्रमुख मनोजकुमार शिंदे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Pradeep Pendhare

Sunil Tatkare Return Gift : एकनाथ शिंदे शिवसेनेतील मंत्री भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांच्याकडून सातत्याने रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत सकारात्मक भूमिका मांडली जात असताना, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये सक्रिय झाल्याचे दिसत आहे.

त्याचाच भाग म्हणून शिंदे शिवसेनेचे रोहा तालुक्याचे माजी तालुकाप्रमुख मनोजकुमार शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर तटकरे यांनी वाढदिवसानिमित्त 'रिटर्न गिफ्ट' दिल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मनोजकुमार शिंदे यांनी खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवेशानंतर त्यांनी शिंदे गटातील स्थानिक नेतृत्वाबाबत नाराजी व्यक्त करत, "ज्यांच्यासाठी संघर्ष केला, त्यांच्याकडूनच अविश्वास व्यक्त झाला. ज्यांनी माझा विश्वासघात केला, त्यांना येणाऱ्या काळात त्याची राजकीय किंमत मोजावी लागेल," असे वक्तव्य केले.

मनोजकुमार शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात त्यांच्याविरोधात एकनाथ शिंदे शिवसेना (Shivsena) पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारी करण्यात आल्या. या तक्रारींमुळे त्यांच्या भूमिकेबाबत पक्षात संशय निर्माण झाला. त्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला आणि पुढे पक्षापासून दूर राहिले.याच काळात त्यांचा संपर्क खासदार सुनील तटकरे यांच्याशी आला. त्यानंतर सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला.

प्रवेशानंतर मनोजकुमार शिंदे यांनी आपल्यावरील आरोपांनाही उत्तर दिले. "जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात माझ्यावर अनेक चुकीचे आरोप झाले. त्यातील एक जरी आरोप सिद्ध झाला, तर मी कायमचे राजकारण सोडेन. 'कर नाही त्याला डर कशाला'," असे ते म्हणाले.

तसेच, सहकाऱ्यांशी चर्चा करूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. "हाती घेतलेले काम पूर्ण करणे ही माझी ओळख आहे. पुढेही कामाच्या बळावर राजकारणात संधी शोधत राहीन," असेही त्यांनी सांगितले.

मनोजकुमार शिंदे यांच्या प्रवेशामुळे रायगडातील स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. शिंदे गटातील काही स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा यापूर्वीपासून सुरू आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नव्याने दाखल झालेल्या नेत्यांना कोणत्या जबाबदाऱ्या दिल्या जातात आणि पुढील काळात जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा काय परिणाम होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT