Sudhakar Ghare Vs Mahendra Thorve Sarkarnama
कोकण

Raigad Politics : शिंदेंच्या शिलेदाराविरोधात तटकरेंची मोर्चेबांधणी; घारेंना आशीर्वाद देऊन थोरवेंना केलं कॉर्नर

Shivsena Vs NCP : सुनील तटकरे यांच्या या राजकीय खेळीचा थेट फटका शिवसेनेचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांना बसू शकतो. त्यामुळे रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी या वादाला आणखी एक कारण मिळाले आहे.

Hrishikesh Nalagune

Raigad News : पुढच्यावेळी मी कर्जतमध्ये आलो असेल तेव्हा सुधाकर घारे यांचे पुनर्वसन झालेले असेल. शिवाय शासन स्तरावर श्रीवर्धन पेक्षा काकणकभर अधिक निधी कर्जत मतदारसंघात दिला जाईल. अनेक दिवसांनी आलो असलो तरी मधल्या काळाची भरपाई केली शिवाय राहणार नाही, अशी आश्वासन देत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदार सुधाकर घारे यांना ताकद दिली आहे.

तटकरे यांच्या या राजकीय खेळीचा थेट फटका शिवसेनेचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांना बसू शकतो. त्यामुळे रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी या वादाला आणखी एक कारण मिळाले आहे. आधीच पालकमंत्री पदावरून सुरु असलेला वाद, भरत गोगावले विरुद्ध सुनील तटकरे यांच्यातील वितुष्ट, तटकरे आणि राष्ट्रवादीकडून शिवसेनेला चेपवण्यासाठी सातत्याने आरोप होत असतात. याच वादात आता तटकरेंनी आमदार थोरवे यांनाही डिवचले आहे.

सुधाकर घारे हे थोरवे यांचे पारंपारिक विरोधक मानले जातात. विधानसभा निवडणुकीपूर्वी ही जागा शिवसेनेला सुटल्याने त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला. बंडखोरी करत थोरवे यांना कडवे आव्हान दिले. त्यानंतर अटीतटीच्या थोरवे यांचा विजय झाला. आता घारे पुन्हा राष्ट्रवादीत सक्रिय झाले आहेत. त्यांना तटकरे यांनी पुनर्वसनाचे आश्वासन दिले आहे. शिवाय काकणभर जास्त निधी देण्याचे आश्वासन देत थोरवे यांचेही श्रेय घारेंकडे वळवण्याचा डाव टाकला आहे.

यावेळी सुधाकर घारे यांनीही थोरवे यांची धाकधूक वाढवली. ते म्हणाले, मी अक्षप लढलो तरीही 90 हजार मते मिळाली. शिवाय डमी उमेदवाराला पडलेली साडेतीन हजार मते आणि एका ईव्हीएम मधील मते मोजली गेली नाहीत. त्यामुळे या निवडणूक निकालाविरोधात आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आमदारांच्या मनात धाकधुक आहे, असा टोला आमदार महेंद्र थोरवे यांचे नाव न घेता घारे यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT