Mahendra Thorve-Sunil Tatkare Sarkarnama
कोकण

Sunil Tatkare Vs Mahendra Thorve : राष्ट्रवादी काँग्रेसला विश्वासघातकी म्हणणाऱ्या थोरवेंचा विषय तटकरेंनी एकाच वाक्यात संंपवला; म्हणाले...

Raigad Political News : जुन्नर, मावळ इंदापूर यासारख्या काही ठराविक मतदारसंघात महायुतीतील भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत एकमेकाला डिवचण्याचं काम सुरू झालं आहे.

Deepak Kulkarni

Raigad News : एकीकडे भाजपचे संयमी नेते रवींद्र चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे आक्रमक नेते रामदास कदम यांच्यात टोकाचे मतभेद झाले. याची दखल खुद्द उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली. यावरून महायुतीत सारं काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले. यातच आता महायुतीत वादाची दुसरी ठिणगी रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेत पडली आहे.

शिंदे गटाचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत जिल्ह्याला लाभलेलं नेतृत्व विश्र्वासघातकी आहे. महायुतीत गद्दारी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा थोरवे यांनी सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यासह राष्ट्रवादीला दिला होता.

तटकरेंनी देखील जशास तसं उत्तर देताना महेंद्र थोरवेला मी मोजत नाही. माझे स्थानिक नेते त्याला उत्तर देतील असा पलटवार केला. तर आमदार थोरवे हे स्वतः च विश्र्वासघातकी असून विश्वासघात कुणी आंक कोण करतय हे दुनियेला माहिती असल्याचा हल्लाबोल सुधाकर घारे यांनी केला.

यामुळे कोकणातील राजकारण आरोप प्रत्यारोपांनी चांगलंच तापलं आहे.लोकसभा निवडणूक जिंकल्यामुळे रायगडमध्ये आता तटकरे यांचा दबदबा पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. त्याचमुळे कुठेतरी तटकरे यांच्या वाढत्या वर्चस्वाला टक्कर देण्याची तयारी केली आहे.

जुन्नर, मावळ इंदापूर यासारख्या काही ठराविक मतदारसंघात महायुतीतील भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत एकमेकाला डिवचण्याचं काम सुरू झालं आहे. रविवारी भाजप नेत्या आशा बुचके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना काळे झेंडे दाखवले होते.

तसेच काही दिवसांपूर्वी मावळचे आमदार सुनील शेळके आणि भाजपचे बाळा भेगडे, इंदापूरला हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) आणि राष्ट्रवाद्दीचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यात दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत.त्यामुळे महायुती समोर आता महाविकाससह युतीतील मित्रपक्षांचे देखील आव्हान असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT