Pramod Sawant : प्रमोद सावंतांनी गोवा मंत्रिमंडळात लवकरच मोठ्या बदलाचे दिले संकेत!

Pramod Sawant on Goa Cabinet : सरकारसाठी अडचणीच्या ठरलेल्या मंत्र्यांची गच्छंती आता अटळ असल्याचे यातून दिसत आहे.
Pramod Sawant
Pramod SawantSarkarnama
Published on
Updated on

Pramod Sawant News : गोवा मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत सुरु असलेल्या चर्चांना खुद्द मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे दुजोरा दिला आहे. मंत्रिमंडळात लवकरच महत्वाचा बदल करण्याबाबत सूतोवाच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सावंतांनी याबाबत वक्तव्य केले आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले 'भाजप(BJP) सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत, आगामी निवडणुकीसाठी तीन वर्षे बाकी आहेत. राज्यात अनेक महत्वपूर्ण बदल झाले आहेत. अजूनही व्हायची गरज आहे. विकसित भारत 2047चे स्वप्न पाहत असताना, टीम गोवा विकसित गोवा 2047साठी प्लॅनिंग करण्याची गरज आहे.'

Pramod Sawant
Goa Assembly : गोवा विधानसभेत ST ला मिळणार आरक्षण; संसदेत लवकरच निर्णय?

तसेच 'येत्या काळात मंत्रिमंडळात काही बदल होतील, मी नाही म्हणत नाही. पण, यासाठी अजून काही वेळ जाईल', असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत(Pramod Sawant) म्हणाले. तसेच, त्यांनी मंत्रिमंडळात बदलाची गरज असल्याचे या मुलाखती दरम्यान नमूद केले.

मुख्यमंत्री सावंत यांच्या वक्तव्याने मंत्रिमंडळातील बदलाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. सरकारसाठी अडचणीच्या ठरलेल्या मंत्र्यांची गच्छंती आता अटळ असल्याचे यातून दिसत आहे.

कळंगुटचे आमदार मायकल आमदार लोबो यांनी गोवा सरकारमध्ये 'ऑल इज नॉट वेल', असे म्हटल्याने सत्ताधारी भाजपमध्ये धूसफूस सुरु झाली. सत्ताधाऱ्यांकडे बहुमत असताना काही विधेयकं माघारी घ्यावी लागली त्यामुळे लोबोंनी ऑल इज नॉट वेल, असे म्हटले होते.

Pramod Sawant
Goa Politics : 'गोवा भाजपमध्‍ये ऑल इज नॉट वेल'; पक्षांतर करुन आलेल्या मायकल लोबोंचा घरचा आहेर

लोबोंच्या वक्तव्याची प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी गंभीर दखल घेऊन पक्षाची प्रतिमा खराब होईल आणि विरोधकांना फायदा होईल, अशी वक्तव्य न करण्याची समज दिली.

याबाबत मुख्यमंत्री सावंत यांना विचारणा केली असता सरकारमध्ये 'ऑल इज वेल' असल्याचे म्हटले आहे. 'काही जणांना मनासारखे झाले नाही तर ऑल इज नॉट वेल वाटायला लागते. पण, सगळे सुरळीत सुरु आहे. गोवा विविध क्षेत्रात प्रगतीपथावर आहे,' असे सावंत यांनी या मुलाखतीत नमूद केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com