Shivsena Case Sarkarnama
कोकण

Shivsena Case : सुप्रीम कोर्टात ठाकरेंच्या वकिलाचा जोरदार युक्तिवाद : मात्र शिंदेंच्या शिलेदाराने मुद्द्यालाच हात घातला; 'ठाकरेंचा दुतोंडीपणा...'

Nilesh Rane Shivsena Party and Symbol Case : सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत गुरुवारी दुपारी सुनावणी पार पडली. आता यावरून पुढील सुनावणी मंगळवारी ४ ऑगस्टला होणार आहे.

Aslam Shanedivan

Kokan Politics : शिवसेना कोणाची यावरून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात वाद सुरू आहे. या वादावरूनच आता सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असून, आज यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला.

२०२३ मध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली, जी आज २०२६ मध्येही सुरू आहे. मी कधीच तारीख मागितली नाही, असा दावा केला आहे. मात्र, आता सिब्बल यांचा हा दावा शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी खोडून काढत ठाकरे गटाला डिवचले आहे. त्यांनी, उबाठाचे वकीलच पुढची तारीख मागतात. त्यांची तयारी नाही, त्यांना कोर्टकडे सांगायला काहीच नसल्याचे म्हणत निशाणा साधला आहे.

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत गुरुवारी (ता. ३०) दुपारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी ठाकरे यांच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी, चिन्ह हे पक्षासाठी महत्त्वाचे असून, सुनील प्रभू पक्षाचे प्रतोद असताना नवा प्रतोद का नेमला, अशी विचारणा केली. तसेच निवडणूक आयोगाने अनेक बाबींकडे दुर्लक्ष केल्याचे सांगत, ठाकरे यांच्या शिवसेनेने दिलेली घटना निवडणूक आयोगाने बघितलीदेखील नाही, असे सांगितले.

यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सिब्बल यांनी केलेल्या युक्तिवादावर टिप्पणी करताना, कोर्टाने सर्व मुद्दे संकलित करून देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुढील सुनावणीसाठी मंगळवार, ४ ऑगस्ट ही तारीख दिली आहे. यामुळे आता या होणाऱ्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

या दरम्यान आमदार निलेश राणे यांनी ठाकरे गटाला टोला लगावत टीका केली आहे. त्यांनी, शिवसेना पक्ष आमचाच आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. याप्रकरणात जर उबाठाची कार्यपद्धती पाहिली, तर त्यांच्याकडे सांगण्यासारखं काहीच राहिलेलं नाही. यामुळेच त्यांचे वकीलच पुढची तारीख मागतात. त्यांची तयारी नाही, त्यांना कोर्टकडे सांगायला काहीच नाही. यामुळेच जज साहेबांनी त्यावर ताशेरे ओढलेले होते.

जज साहेबांनी, तुम्ही बाहेर एक बोलता आणि येथे येऊन सांगता, पुढची तारीख द्या! असे म्हणत जज साहेबांनीच हा दुतोंडीपणा बाहेर काढला आहे. त्यामुळे पक्ष कोणाचा आहे, हे २०२४ मध्ये आणि जिल्हा परिषद निकालांमध्ये स्पष्ट झाले आहे. सगळीकडे आम्हीच १ नंबर आहोत, पक्ष कोणाचा आहे, हे फक्त औपचारिकता राहिली. याचाही निकाल आता कोर्टातून लवकरात लवकर लागेल, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT