Suryakant Dalvi-Yogesh Kadam Sarkarnama
कोकण

कदम पितापुत्रांना रोखण्याची जबाबदारी दळवींनी जबाबदारी चोख पार पडली

सरकारनामा ब्यूरो

दाभोळ : शिवसेना नेते व राज्याचे माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांच्यात झालेल्या मोबाईलवरील कथित संभाषणाचा फटका दापोलीचे आमदार योगेश कदम (MLA Yogesh Kadam) यांना चांगलाच बसला. दापोलीत नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी आघाडीने 17 पैकी 14 जागा जिंकल्या. कदम समर्थक 12 पैकी केवळ 2 उमेदवार विजयी झाले.त्यामुळे हा कदम पितापुत्राना धक्का मानला जात आहे. मात्र मंडणगडमध्ये त्याना काहीसा दिलासा मिळाला आहे.

दापोली नगरपंचायत निवडणुकीत रामदास कदम व योगेश कदम याना बाजूला ठेवून सर्व सूत्रे सूर्यकांत दळवी यांच्याकडे देण्यात आली होती. कारण शिवसेनेचे नेते रामदास कदम व प्रसाद कर्वे यांच्यात झालेले कथित संभाषण उघड झाल्यावर त्याची गंभीर दखल शिवसेना नेतृत्वाने घेतली होती. 5 वर्षे पक्षाच्या प्रवाहाबाहेर असलेल्या माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे सुत्रे दिल्यावर त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादी आघाडी करून जागावाटपही केले. 17 जागांमध्ये शिवसेनेला 8 तर राष्ट्रवादीला 9 जागा देण्यात आल्या.


आमदार योगेश कदम यांच्या समर्थकांनी बंडखोरी करत शिवसेवा विकास आघाडीच्या माध्यमातून दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी 12 उमेदवार उभे केले होते; मात्र या उमेदवारांवर बंडखोरीचा शिक्का बसला. पक्षाचे चिन्ह नसल्यामुळे 12 पैकी केवळ 2 उमेदवार विजयी झाले. शिवसेनेचे 6 व राष्ट्रवादीचे 8 उमेदवार निवडून आल्याने दापोली नगरपंचायतीवर शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता स्थापन होणार आहे. नगराध्यक्षपदही पहिली अडीच वर्षे राष्ट्रवादीकडे तर पुढील अडीच वर्षे शिवसेनेकडे राहणार आहे.

कोंडीत पकडण्याची सुरवात
शिवसेना नेतृत्वाने सेनेचे नेते रामदास कदम व आमदार योगेश कदम यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला असून, त्याची सुरवात नगरपंचायत निवडणुकीपासून सुरू केली असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी ग्रामीण भागातील सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आमदार योगेश कदम यांच्या पाठीशी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूकही शिवसेना राष्टवादी आघाडीच्या साहाय्याने लढवली जाणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT