Rajan Salvi Sarkarnama
कोकण

Rajan Salvi : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींची ACB कडून झाडाझडती

ACB inquiry of Thackeray gat MLA : गुरुवारी मालमत्तांच्या झाडाझडतीनंतर आमदार साळवींची रत्नागिरी कार्यालयात चौकशी

सरकारनामा ब्यूरो

Ratnagiri Political News :

राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात त्यांच्या निवासस्थानावर तीन ठिकाणी एसीबीने छापे घातले होते. त्यानंतर त्यांना 22 जानेवारी रोजी चौकशीसाठी रत्नागिरी कार्यालयात येण्याचे समन्स बजावले होते.

या समन्सप्रमाणे आज आमदार राजन साळवी त्यांचे बंधू दीपक साळवी यांच्यासह चौकशीसाठी आले. दोघांची चौकशी सुरू असतानाच एसीबी कार्यालयाबाहेर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते जमा होऊन घोषणाबाजी करत आहेत. आमदार राजन साळवी यांची अँटी करप्शन ब्यूरोने चौकशी सुरू केल्याने त्यांचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी (18 जानेवारी) सकाळी नऊ वाजल्यापासूनच एसीबीने (ACB) धडक कारवाई सुरू केली होती. त्यांच्या निवासस्थानासह त्यांच्या तीन मालमत्तांची झाडाझडती घेतली. एकूण ज्ञात उत्पन्नापेक्षा 3 कोटी 53 लाख 89 हजार 752 रुपये जास्त असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडे तब्बल 118.96 टक्के अपसंपदा जमा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑक्टोबर 2009 ते 2 डिसेंबर या कालावधीमध्ये रत्नागिरी (Ratnagiri) शहर हद्दीत आणि जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी ही संपत्ती असल्याचा आरोप अँटी करप्शन विभागाकडून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी आमदार राजन साळवी यांना अटक होण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यांच्याकडील बेहिशेबी मालमत्तेचा समाधानकारक खुलासा आमदार राजन साळवी यांनी सादर केला नाही, म्हणून आमदार राजन साळवी, त्यांच्या पत्नी अनुजा साळवी आणि मुलगा शुभम साळवी यांच्यावर गुरुवारी त्नागिरी शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांचा तपास रत्नागिरीचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय अधिकारी सुशांत चव्हाण करत आहेत.

राजन साळवी यांची एसीबीकडून दीड वर्षापासून चौकशी सुरू आहे. यापूर्वी त्यांना सहावेळा समन्स बजावण्यात आले होते. त्यांची याआधी अलिबागच्या अँटी करप्शन ब्यूरोच्या कार्यालयात चौकशी झाली होती. एकीकडे आमदार साळवीच्या मागे एसीबी, दुसरीकडे ठाकरे गटाचे दुसरे आमदार रवींद्र वायकर यांची आयकर विभागाकडून चौकशी सुरू असल्यामुळे ठाकरे गटाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप होत आहे.

(Edited by Avinash Chandane)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT