<div class="paragraphs"><p> Nitesh Rane </p></div>

Nitesh Rane

 

Sarkarnama 

कोकण

अतिरिक्त SP, DySP आणि पोलिस निरीक्षक अशा तिघांकडून नितेश राणेंची कसून चौकशी

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या (Sindhudurg District Bank) निवडणुकीच्या वादात शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणात आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे आज पोलिसांसमोर हजर झाले. या हल्ल्याच्या चौकशासाठी उपस्थित राहण्यासाठी कणकवली पोलिसांनी त्यांना 21 तारखेला नोटीस बजावली होती.

अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्ष, उपअधीक्षक, पोलिस निरीक्षत अशा तिघांनी पाऊण तास ही चौकशी केली. या चौकशीला आपण सर्वतोपरी सहकार्य केल्याचे राणे यांनी नंतर सांगितले. यापुढेही चौकशीसाठी बोलविल्यानंतर हजर राहणार असल्याचे आश्वासन पोलिसांना दिले आहे. जी माहिती पोलिसांना हवी होती ती दिली असल्याचे ही सांगितले.

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख म्हणू संतोष परब काम पाहत होते. त्यांच्यावर 18 डिसेंबर रोजी हल्ला झाला होता. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नीतेश राणे यांच्यावर या प्रकरणी आरोप केले होते. हहल्ला प्रकरणामागे एकूण सात संशयित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील पाचजणांना अटक केली आहे. उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. कणकवली रेल्वे स्थानकालगत नरडवे रस्त्यावर शनिवारी (ता. १८ डिसेंबर) सकाळी अकराच्या सुमारास संतोष परब यांच्या मोटारसायकलला धडक दिल्याने ते खाली पडल्यानंतर त्यांच्यावर एका तरुणाने चाकू हल्ला केला. त्यानंतर संशयित मोटारचालकाला फोंडाघाट चेकपोस्टवर पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

कणकवली पोलिस ठाण्यात फिर्यादी संतोष परब यांचा पुन्हा एकदा जबाब घेतला आहे. या तपासात पोलिसांनी गुप्तता पाळली आहे. कणकवलीत पोलिस सुरक्षा वाढविण्यात आली आहे. या घटनेतील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी सापळा रचला आहे; मात्र मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती सापडलेला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT