Shashikant Warise news Update: रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या संशयास्पद मृत्यूवरून पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर राज्य सरकारने शशिकांत वारीशे यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत करण्याची घोषणा केली.
यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वारिसे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर आता राऊतांनी या प्रकरणावर दोन महत्वाचे सवाल उपस्थित केले आहेत. राऊत म्हणाले, ''वारीशे यांची हत्या झाली. मात्र, हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न होतो आहे. सरकारने एसआयटी नेमली आहे. पण एसआयटीचा तपास निःपक्षपाती होईल का? अशी शंका आहे'', असं ते म्हणाले.
''महत्वाचे म्हणजे ज्या ठिकाणी वारीशे यांना चिरडण्यात आलं. तेथील पेट्रोल पंप आणि त्या परिसरातील आजू-बाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे एकचवेळी बंद कसे? तसेच यामागे कोण-कोण आहे? याचा शोध घेण्यात यावा'', असं म्हणत त्यांनी हे दोन महत्वाचे सवाल उपस्थित केले. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुढे राऊत म्हणाले, ''तरुण पत्रकारला अशा प्रकारे मारण्यात आलं. हे धक्कादायक आहे. खरं तर कोकणाने महाराष्ट्राला आणि देशाला प्रमुख पत्रकार दिले. त्यामध्ये टिळक, जांभेकर हे कोकणातले आहेत. मग याच भूमीत तरुण पत्रकाराने मांडलेल्या भूमिका कुणाला पटत नाही त्यामुळे त्याला गाडीखाली चिरडून टाकण्यात आलं, हे दुर्देवी आहे'', असं ते म्हणाले.
''मात्र, ही हत्या साधी नाही. लोकांची भूमिका मांडणारा पत्रकार असा चिरडला जातो. त्यामागे कोण-कोण आहे? याचा तपास निःपक्षपाती पणे करण्यात यावा. यामध्ये काहीतरी राजकीय षडयंत्र आहे. कारण शशिकांत हा रिफायनरीच्या विरोधात लिहित होता. त्यामुळे यामधूनच ही हत्या झाली'', असा आरोप यावेळी संजय राऊतांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.