CM On Koshyari : मुख्यमंत्री म्हणाले, ‘महाराष्ट्राला कोश्यारींची ओळख ‘या’ कारणांमुळे कायम राहील’

राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला केलेले सहकार्य आणि महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान विसरता येणार नाही.
Eknath Shinde-Bhagat Singh Koshyari-Devendra Fadnavis
Eknath Shinde-Bhagat Singh Koshyari-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : आपल्या विधानांनी वादग्रस्त ठरलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना नुकतेच पदमुक्त करण्यात आले आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांकडून महाराष्ट्राची सुटका झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली, तर सत्ताधारी भाजप-शिंदे गटाकडून राज्यपालांच्या कामाबाबत कौतुक करण्यात आले. कोश्यारी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. त्यावेळी शिंदे यांनी ‘राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रमांना उपस्थित राहिलेले राज्यपाल अशी कोश्यारी यांची ओळख महाराष्ट्राला कायम राहील,’ असे सांगितले. (Governor Bhagat Singh Koshyari's identity will remain with Maharashtra forever : Eknath Shinde)

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज (ता. १७ फेब्रुवारी) राजभवन येथे जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निरोप दिला. या प्रसंगी राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर तसेच राजभवनातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Eknath Shinde-Bhagat Singh Koshyari-Devendra Fadnavis
Sharad Pawar : भाजपच्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी आघाडीनं आपला हुकमी पत्ता काढला; शरद पवार सभा घेणार

या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यकाळात राजभवनात अनेक कार्यक्रम आयोजित केले गेले. तसेच, राजभवनातील विस्तारित इमारतीचे बांधकामही त्यांच्याच कार्यकाळात करण्यात आले आहे. याशिवाय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कार्यक्रमांना स्वतः उपस्थित राहिलेले राज्यपाल अशीही त्यांची ओळख महाराष्ट्राला कायमच राहील.

Eknath Shinde-Bhagat Singh Koshyari-Devendra Fadnavis
Sharad Pawar : पहाटेच्या शपथविधीवरुन पवारांनी फडणवीसांना पुन्हा फटकारलं ; "फडणवीसांचे महत्व.."

राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला केलेले सहकार्य आणि महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान विसरता येणार नाही. त्याबद्दल पुष्पगुच्छ आणि गणेशाची प्रतिमा भेट म्हणून देऊन त्यांचे राज्य सरकारच्या वतीने आभार मानण्यात आले.

Eknath Shinde-Bhagat Singh Koshyari-Devendra Fadnavis
Praveen Darekar : सहकार क्षेत्राला पवार आणि शाहंच्या चर्चेतून दिशा मिळेल; दरेकरांनी व्यक्त केला विश्वास

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी (ता. १४ फेब्रुवारी) झालेल्या बैठकीत अभिनंदनाचा ठराव करण्यात आला होता. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा ठराव मांडला होता. त्यावेळी त्याचीही चर्चा झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com