Mahayuti Politics; MVA, Uday Samant And Rohit Pawar sarkarnama
कोकण

Uday Samant : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ? मंत्री संजय शिरसाट यांच्या पाठोपाठ उदय सामंतांचा मोठा दावा

Rohit Pawar On Mahayuti Politics : नुकताच राज्यातील नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या असून आता महापालिकेंच्या निवडणुकांकडे राज्याचे लक्ष लागले आहे. अशातच महापालिका निवडणुकीनंतर भाजप आपल्या मित्रपक्षांची साथ सोडणार असा दावा रोहित पवारांनी केला होता.

Aslam Shanedivan

  1. उदय सामंत यांनी दावा केला की अनेक महाविकास आघाडीचे आमदार आधीच महायुतीच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत, त्यामुळे हिवाळी अधिवेशनाचे राजकारण तीव्र झाले.

  2. रोहित पवार यांनी महापालिका निवडणुकीनंतर भाजप आपल्या मित्रपक्षांना सोडून देईल असे भाकीत केल्यानंतर हे विधान आले.

  3. राजकीय वर्तुळात आता अटकळांची चर्चा सुरू आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय परिदृश्यात मोठे वादळ निर्माण झाले आहे.

Nagpur Winter Session : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली असून आज तिसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी विरोधीपक्षनेते पदावरून राजकीय वातावरण तापल्यानंतर आता राजकीय पक्ष कोणाची साथ सोडणार कोण कोणाबरोबर जाणार याचीच चर्चा आता सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी महापालिका निवडणुकीनंतर भाजप आपल्या मित्रपक्षांची साथ सोडणार असा दावा केला होता. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बोलताना, मविआचे कित्येक आमदार हे महायुतीच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. ज्यानंतर आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नुकताच विरोधी पक्षनेते पदावरून पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना छेडले होते. तेच विरोधी पक्षनेते पदाच्या रेसमध्ये असल्यावरून प्रश्न विचारला होता. ज्यावर त्यांनी या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेचे 13 आमदार आपल्या संपर्कात आहेत.

या सर्व आमदारांची नावे माझ्याकडे आहेत. वेळ आल्यावर मी ती सांगेन. हे आमदार ठाकरेंच्या कार्यपद्धतीला वैतागले असून ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत येण्याचा मानस व्यक्त केल्याचा दावा मंत्री संजय शिरसाट यांनी केला होता. यावरून आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आमदारांना एकसंध ठेवण्याच्या प्रयत्नांना झटका बसण्याची भीती वर्तवली जात होती.

अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी, मुंबईची निवडणूक संपली की भाजप एकनाथ शिंदेंना टार्गेट करणार असल्याचा दावा केला आहे. त्यांनी भाजपला आता कुबड्याची गरज संपलेली असून अमित शहांनी देखील आम्हाला कुबड्यांची गरज नाही, असे संकेत दिले होते.

यामुळे आता कुबड्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काहींची अपेक्षा होती, आदराने कुबड्यांना खोलीमध्ये टांगलं जाईल पण आता या कुबड्या तोडून चुलीत घालायचा भाजपचा प्रयत्न असल्याचा टोलाही पवार यांनी लगावला. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

यावर या सगळ्यांचे निवडून आलेले आमदार हे महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संपर्कामध्ये आहेत. सांगायचेच झाल्यास युबीटीचे काही आमदार हे आमच्या संपर्कामध्ये आहेत. त्याची प्रचिती तुम्हाला एक महिन्याभरामध्ये येईल. तसेच ज्यांनी हे वक्तव्य केलं त्यांच्या पक्षाचे आमदार अजितदादांच्या संपर्कामध्ये आहेत. त्याचीही प्रचिती तुम्हाला एक दोन महिन्यांमध्ये येईल.

त्यामुळे नक्की आपण स्वतः काय करायचं ते काही लोकांना कळत नसल्यामुळेच अशा पद्धतीची वक्तव्य होतात. इथं कुठेही महानगरपालिका झाल्यानंतर महायुतीमध्ये मतभेद निर्माण होतील भाजप आम्हाला वाऱ्यावर सोडेल असे होणार नाही. याआधी देखील विधानसभेला आणि त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये यांचे मनसूबे धुळीला मिळाले आहेत. हे माझं म्हणणं 21 तारखेला स्पष्ट होईल असेही त्यांनी म्हटले आहे.

FAQs :

1. उदय सामंत यांनी नेमकं काय विधान केलं?
त्यांनी दावा केला की MVA चे अनेक आमदार महायुतीच्या संपर्कात आहेत.

2. रोहित पवारांनी कोणता इशारा दिला होता?
महापालिका निवडणुकीनंतर भाजप आपल्या मित्रपक्षांना सोडणार, असा दावा त्यांनी केला.

3. या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात काय वातावरण आहे?
दोन्ही वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.

4. या चर्चेचा हिवाळी अधिवेशनावर काय परिणाम झाला?
अधिवेशनातील वातावरण अधिक तंग व तापलेले झाले.

5. महायुतीमध्ये आमदार येणार का?
सामंतांच्या वक्तव्यामुळे अशी शक्यता चर्चेत आली आहे, मात्र अधिकृत पुष्टी नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT