

मागाठाणे येथील ५७ झोपडपट्टी घरे पाडण्यात पालिकेने एका बिल्डरशी संगनमत केल्याचा आरोप करत आमदार प्रकाश सुर्वे यांनी स्वतःच्या सरकारवर जोरदार टीका केली.
आमदार भास्कर जाधव यांनीही विधानसभेत संताप व्यक्त केला आणि लक्षवेधी सूचना देऊनही त्यांना या मुद्द्यावर उत्तरे मिळाली नाहीत असा दावा केला.
दोन्ही आमदारांनी मंत्री उदय सामंत यांना घेरले, त्यांनी सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप करत नागपूर अधिवेशनात प्रचंड गोंधळ घातला.
Nagpur News : मागाठाणे मतदारसंघात येणाऱ्या झोपडपट्टीतील तब्बल 57 घरे आणि दुकाने पाडल्यासंदर्भात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी लक्षवेधी मांडत आज आपल्याच सरकारविरोधात रोष व्यक्त केला. यावेळी त्यांनी, महापालिकेने बिल्डरशी संगनमत करून हे तोड काम केल्याचा दावा केला. तसेच लक्षवेधीत समोर आलेल्या उत्तरावर आक्षेप घेत अधिकाऱ्यांनी आपल्याच मंत्र्यांची दिशाभूल केली असून त्याचपद्धतीने आमचे मंत्री थातूरमातूर उत्तर देतात, अशा शब्दात मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव देखील चांगलेच भडकलेले दिसले. त्यांनी लक्षवेधी लागली असून आतापर्यंत उत्तर मिळालेलं नसल्याचे म्हणत संताप व्यक्त केला आहे. यामुळे एकाच वेळी उदय सामंत यांना दोन्ही आमदारांनी चांगलेच अडचणीत आणल्याचे दिसत आहे.
आमदार सुर्वे यांनी विधानसभेत मागाठणे मतदारसंघातील महापालिकेच्या तोडकामाच्या कारवाईबाबत लक्षवेधी मांडली होती. त्यांनी, महापालिकेने बिल्डरशी हातमिळवणी करत झोपडपट्ट्यांवर कारवाई केली. तब्बल 57 घरे आणि दुकाने पाडली. धक्कादायक म्हणजे ही कारवाई करताना, कोणताच आदेश दाखवला नाही. त्याला कोर्टाचीही मान्यता नाही.
येथे लोकांनी मालकाकडून जमिनी घेवून घरे उभारली होती. पण फक्त महापालिकेने बिल्डरशी हातमिळवणी करत 50 झोपड्यांवर कारवाई केलीच. शिवाय 280 घरांवर नोटीस लावल्याचे काम करत इथल्या लोकांना बेघर करण्याचं काम महापालिकेने केल्याचा दावा सुर्वे यांनी केला. तर ज्या अधिकाऱ्यांनी हे काम केले त्यांच्याबरोबर त्या बिल्डरवरही गुन्हे दाखल करावे अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी सुर्वे यांच्या विषयाशी शासन 100 टक्के सहमत असल्याचे उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी म्हटले. तसेच त्यांनी, या प्रकरणाची समिती नेमून 60 दिवसांमध्ये चौकशी केली जाईल. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत इथली सर्व कार्यवाही स्थगित केली जाईल. जी माहिती सदस्यांनी दिली आहे ती अतिरिक्त मुख्य सचिवांकडे दिली जाईल. तर जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे म्हटले.
ज्यावर सुर्वे यांनी, आपला रोष व्यक्त करत आमच्या मंत्र्यांनीच लक्षवेधीवर अत्यंत थातूरमातूर उत्तर दिले आहे. ते हुशार मंत्री आहेत, कुठला मुद्दा कुठे न्यायचा हे त्यांना उत्कृष्टपणे कळते. गुगली टाकण्यात तर ते मास्टर आहेत. तरूण आहेत आणि आमच्या पक्षातील दुसऱ्या फळीतील मोठे नेते आहेत. मात्र अधिकाऱ्यांनी त्यांना काहीतरी चुकीची माहिती दिली आहे. गोरगरीबांची घरे तोडण्यासाठी अधिकाऱ्यांनी बिल्डरशी संगनमत केले. घरांना नोटीस दिल्या, खासगी बाऊन्सर लावत कारवाई करण्यात आली. मंदिरही बंद करण्यात आले. लोकांना घरातील सामानही काढू दिले नाही. त्यामुळे बिल्डरवर गुन्हा दाखल व्हायलाच हवा अशी आग्रही मागणी त्यांनी केलीय.
यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव देखील चांगलेच भडकलेले दिसले. त्यांनी लक्षवेधी लागली असून आतापर्यंत उत्तर मिळालेलं नसल्याचे म्हणत संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी यावरून मंत्री मकरंद पाटील यांना देखील धारेवर धरत लक्षवेधीचे उत्तर कुठं आहे अशी विचारणा केली. यावरून गोंधळून गेलेल्या मंत्री पाटील यांनी माझ्याकडे उत्तर आहे, मी तपासून घेतो असे उत्तर दिले. यानंतरच उदय सामंत यांनी भास्कर जाधव यांची बाजू घेत खडेबोल सुनावले...
FAQs :
1. मागाठाणे झोपडपट्टी पाडकामाचा वाद कशामुळे निर्माण झाला?
महापालिकेने 57 घरे आणि दुकाने पाडल्यामुळे लोकांमध्ये संताप निर्माण झाला.
2. प्रकाश सुर्वेंनी सरकारवर कोणता आरोप केला?
महापालिकेने बिल्डरशी संगनमत करून पाडकाम केल्याचा आरोप केला.
3. भास्कर जाधव का संतापले होते?
लक्षवेधीत उत्तर न मिळाल्याने ते आक्रमक झाले.
4. उदय सामंत कोणत्या कारणामुळे अडचणीत आले?
दोन्ही आमदारांनी त्यांच्यावर दिशाभूल केल्याचे आरोप केले.
5. नागपूर अधिवेशनात वातावरण का तापले?
सत्ताधारी आमदारांनीच आपल्या सरकारवर जोरदार टीका केल्यामुळे वातावरण तापले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.