Uday Samant sarkarnama
कोकण

Uday Samant : 'मी ही शब्दांचा पक्का!, शेवटी अजितदादांना...', उदय सामंतांनी सांगितलं ते करून दाखवलं

Uday Samant On Ajit Pawar : बारामती म्हटलं की पवार आणि तेथील विकास असे समिकरण आता तयार झाले आहे. यामुळे जागाच्या पाठीवर अनेक लोक बारामतीला भेट देण्यासाठी येत असतात.

Aslam Shanedivan

Ratnagiri News : राज्यातील पुणे आणि त्यातील बारामती म्हटलं की ते विकासाचं रोल मॉडेल डोळ्या समोर उभ राहतं. हे जेष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्यामुळेच आज शक्य झाले आहे. यामुळे येथे जगभारातील लोक भेट देवून जगभर चर्चा करतात. आता आपल्याही जिल्ह्याचा विकास असाच करू आणि बारातमीकरांना एक दिवस रत्नागिरीत आणू असा विडाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उचलला होता. तर त्यांनी आता आपला शब्द खरा करून दाखवला देखील आहे. रत्नागिरीत त्यांनी बारामतीकरांना आणून दाखवले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रत्नागिरीला भेट देवून पेठकिल्ला येथील शिवसृष्टीचं लोकार्पण केलं होतं. त्यानंतर आता सामंत यांनी, 'आपण ही, शब्दाचे पक्के', असल्याचं म्हटले आहे. ते शहरातील दामले विद्यालयाच्या नव्या इमारतीच्या भूमिपुजन सोहळ्याच्या वेळी बोलत होते.

उदय सामंत यांनी, राज्याच्या राजकारणात बारामतीचा उल्लेख वेळोवेळी केला जातो. तर तेथील विकास हा रोल मॉडेल असल्याचे बोलले जाते. यावरून आपण काही वर्षांपूर्वी याच बारामतीकरांना रत्नागिरीत आणू. ते स्वत: येथील विकास पाहायला येतील असा शब्द दिला होता. जो आता सत्यात उतरला आहे. मी बोललो ते खरे ठरले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: येथील विकास पाहायला येऊन गेले. यामुळे 'मी ही माझ्या शब्दांचा पक्का आहे', असे उदय सामंत यांनी म्हटलं आहे. पेठकिल्ला येथील शिवसृष्टीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी अजित पवार रत्नागिरीत गेले होते.

यावेळी उदय सामंत यांनी, पुढच्या दोन वर्षात रत्नागिरीचा कायापालट पाहायला मिळेल असे सांगताना, विविध स्थळांचा विकास केला जाईल, अशी ग्वाही दिली आहे. सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असून देशातील पहिले अंडरआर्म स्टेडिअम येथे होणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या विविधतेसह पर्यटनामुळे विकासात भर पडणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरीत लवकरच विमानसेवा

राज्यात सध्या महायुतीचे सरकार आले असून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पाचव्यांदा विधानसभेत पोहचलो आहे. मी राज्याचा उद्योगमंत्री झालो आहे. तर प्रवासासाठी आपले स्वत:चे काही विमान नसून ते मित्रपरिवार उपलब्ध करून देतात. यामुळे आता लवकरच रत्नागिरीत विमानतळाचे काम पूर्णत्वाकडे नेले जाईल. येत्या वर्ष भरात रत्नागिरीत विमानसेवा सुरू होईल, असे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे.

अजितदादांकडून सामंतांचे कौतुक

अजित पवार यांनी, शिवसृष्टी पाहून डोळ्यांचे पारणे फिटले असे म्हटले होते. तर मी माझ्या राजकीय जीवनामध्ये सुरवात करत असताना अनेक तरुणांना संधी दिली. त्यामध्ये मी उदय सामंत यांना पण तरुणपणामध्ये संधी दिली. ते पक्षाचे युवकचे अध्यक्ष झाले. त्यानंतर येथील लोकप्रतिनिधी झाले. त्याच्यानंतर एक एक टप्पा गाठत रत्नागिरी जिल्हा असेल. राज्यामध्ये अनेक महत्त्वाचे प्रकल्प त्यांनी हातामध्ये घेतले. ते यशस्वी करून दाखवले, अशा शब्दात उदय सामंत यांचे कौतुक केले होते. तर सामंत यांनी, रत्नागिरीत आम्ही नावीन्यपूर्ण उपक्रम राबवतोय, अशा विविध उपक्रमांना आपण अर्थमंत्री म्हणून फार मोठा निधी उपलब्ध करून द्याल, ही देखील खात्री असल्याचे म्हटलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT