Ratnagiri Bank Election Politics; Uday Samant Sarkarnama
कोकण

Ratnagiri DCC Bank Election : उदय सामंत रत्नागिरी जिल्हा बँकेच्या आखाड्यात; भाऊ आमदार किरण सामंतांकडूनही मोर्चेबांधणी

Ratnagiri DCC Bank Election Politics : राज्यभर जिल्हा बँकांच्या निवडणुकींच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून कोकणात देखील आता राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.

Aslam Shanedivan

RDCC Bank Ratnagiri Latest News : राज्यातील विविध जिल्ह्यात सध्या जिल्हा बँकांच्या निवडणुकींच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. अनेक ठिकाणी त्या बिनविरोध व्हाव्यात अशी फिल्डिंग राजकीय नेत्यांकडून लावली जात आहे. अशा तापलेल्या वातावरणात आता रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुकीबाबत बातमी समोर आली आहे.

यावेळी निवडणुकीच्या रिंगणात ‘सामंत पॅटर्न’ पाहायला मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनीच सुतोवाच केले आहेत. त्यांनी आपण बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.

उदय सामंत यांनी आपण थेट सहकार क्षेत्रातील सत्ताकारणात प्रवेश करणार असून आगामी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (आरडीसीसी) निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा रविवारी (ता. २७) केली. रत्नागिरी तालुका प्राथमिक शेती पुरवठा विविध कार्यकारी संस्था मतदारसंघातून उमेदवारी दाखल करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. दरम्यान आता त्यांचे बंधू आमदार किरण सामंतांकडूनही मोर्चेबांधणी केली जात आहे.

राजकीय व्यासपीठ आणि विकासकामांच्या जोरावर जिल्ह्यावर भक्कम पकड मिळवल्यानंतर, आता ग्रामीण अर्थकारणाची नाडी असलेल्या सहकार क्षेत्रावरही वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मंत्री सामंत सज्ज झाले आहेत. सामंत यांनी स्वतः शेती संस्था प्रवर्गातून लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे या मतदारसंघातील लढत अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीची ठरणार आहे. जिल्हा बँकेची निवडणूक लढवणार असून, आपल्याला बँकेचा संचालक व्हायचे आहे.

तसेच, रत्नागिरी तालुका शेती संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. अध्यक्ष होण्यासाठी इच्छुक आहात काय, असे विचारले असता ते म्हणाले, ‘मी संचालक पदासाठी इच्छुक आहे. शिवसेना ताकदीने ही निवडणूक लढणार आहे.’

वेगळी समीकरणे...

जिल्हा बँकेवर डॉ. तानाजीराव चोरगे यांचे वर्चस्व आहे. सर्वपक्षीय पॅनेल असल्याने प्रत्येक पक्षाला यामध्ये संधी दिली आहे. बँकेच्या आगामी निवडणुकीमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत संचालक पदासाठी रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे वेगळी समीकरणे जुळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT