Ahilyanagar DCC Bank Election : अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीचा बिगुल; आजपासून उमेदवारी अर्ज दाखल, बिनविरोध की घमासान?

Nomination begins for 21 constituencies; voting scheduled for November 2 : 28 सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू; 5 ऑक्टोबर अंतिम मुदत, 2 नोव्हेंबरला मतदान तर 3 नोव्हेंबरला मतमोजणी
Ahilyanagar DCC Bank Election
Ahilyanagar DCC Bank ElectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ahilyanagar District Central Cooperative Bank Election : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, आज सोमवार (ता. 28) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.

इच्छुक उमेदवारांना 5 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. बँकेच्या 21 मतदारसंघांसाठी 2 नोव्हेंबर रोजी मतदान, तर 3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

या निवडणुकीसाठी जिल्हा सहकारी बँकेचे (DCC Bank) सभागृह हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय राहणार आहे. सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर राहुरीचे सहायक निबंधक रावसाहेब खेडकर आणि नेवासेचे सहायक निबंधक देविदास घोडेचोर हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

निवडणूक (Election) कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 28 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर असा कालावधी देण्यात आला आहे. 6 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर 7 ते 21 ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. निवडणूक कार्यक्रमातील सर्व टप्प्यांसाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. उमेदवारी अर्जांची विक्री आणि स्वीकृतीसाठीही स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे.

Ahilyanagar DCC Bank Election
Ahilyanagar DCC Bank Election : महायुतीतच कुरघोड्या; अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीआधी संघर्षाची ठिणगी

21 मतदारसंघांसाठी एकाच ठिकाणी अर्ज प्रक्रिया

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 मतदारसंघांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय हेच उमेदवारी अर्जांच्या विक्री आणि स्वीकृतीचे केंद्र राहणार आहे. इच्छुक उमेदवारांना याच ठिकाणाहून संबंधित मतदारसंघाचा अर्ज घेऊन आवश्यक कागदपत्रांसह तो दाखल करावा लागणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक व्यवस्था पूर्ण झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी दिली.

Ahilyanagar DCC Bank Election
Ahilyanagar DCC Bank Election : 'तिसरा पर्याय' फेटाळला नाही! अहिल्यानगर जिल्हा बँकेत मुख्यमंत्री लक्ष घालणार का? राम शिंदेंनी सर्वकाही सांगितले

उमेदवारी अर्जाची किंमत 100 रुपये

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघातील उमेदवारी अर्जाची किंमत 100 रुपये निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना संबंधित मतदारसंघाचा सशुल्क अर्ज घेऊन तो आवश्यक कागदपत्रांसह भरावा लागणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवाराला 2 हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे.

निवडणुकीचे महत्त्वाचे टप्पे

28 सप्टेंबर: उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात

5 ऑक्टोबर: उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख

6 ऑक्टोबर: उमेदवारी अर्जांची छाननी

7 ते 21 ऑक्टोबर: उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत

2 नोव्हेंबर: मतदान

3 नोव्हेंबर: मतमोजणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com