uday samant, bharat gogawale Sarkarnama
कोकण

Bharat Gogawale:..म्हणून भरतशेठ यांनी मंत्रिपद नाकारलं; सामंत म्हणाले, 'स्वभाव बदला...

Konkan Politics: त्यांच्यातील किती टक्के लोक त्यांना फसवतात, हे त्यांनाही माहित नसते.

Mangesh Mahale

Raigad News: "नव्या मंत्रिमंडळात मला नक्की स्थान मिळेल," अशी आशा असलेले शिंदे गटातील नेते, आमदार भरत गोगावले यांना आपला स्वभाव बदलण्याचा सल्ला शिंदे गटातील नेते, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. सामंतांच्या या सल्ल्याचा संदर्भ गोगावले यांना न मिळणाऱ्या मंत्रिपदाशी आहे का? अशी चर्चा आता रायगडमध्ये सुरु झाली आहे.

काल (बुधवारी) भरत गोगावले रायगड दौऱ्यावर आले होते. यावेळी दोन्ही नेते एका कार्यक्रमाला उपस्थित होते. सामंत यांनी भाषण करताना गोगावले यांच्या मंत्रिपदाबाबत मोठा खुलासा करीत त्यांनी मंत्रीपद का नाकारलं याविषयी सांगितले. "भरत गोगावले यांनी स्वतःचा स्वभाव बदलणे गरजेचं आहे. ते लोकांवर इतका विश्वास ठेवतात, की त्यांच्यातील किती टक्के लोक त्यांना फसवतात, हे त्यांनाही माहित नसते, असेही सामंत यांनी म्हटलं आहे.

"भरतशेठ पत्र आणतात आणि मी सह्या करतो, माझ्या दृष्टीने रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरतशेठच आहेत, असे म्हणताना उदय सामंतांनी गोगावले यांना स्वभाव बदलण्याचा हा सल्ला दिला आहे. भरतशेठ लोकांवर इतका विश्वास ठेवतात कि, त्यांच्यातले किती टक्के लोक त्यांना फसवतात ते मला माहित नाही," असेही सामंत म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मीच मुख्यमंत्री झालो...

गोगावले यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी चर्चा सुरु होती, याबाबत उदय सामंतांनी सविस्तर सांगितले. "ज्या दिवशी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार होता, तो दिवस मला आठवतो. मी एकनाथ शिंदे साहेब आणि भरत गोगावले पहाटे चार वाजता एकत्र चर्चा करीत बसलो होतो" "कुणाला मंत्रीमंडळात स्थान द्यायचं आणि कुणाला नाही, असा संभ्रम मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर होता. पण त्यावेळी गोगावले यांनी थेट सांगितलं, की तुम्हाला जर अडचण होत असेल, मानसिक त्रास होत असेल, तर मला मंत्रिमंडळात घेऊ नका. तुम्ही मुख्यमंत्री झालात म्हणजेच मीच मुख्यमंत्री झालो" असा खुलासा सामंतांनी केला. गोगावले यांच्या मंत्रिपदावरून विरोधकही त्यांची खिल्ली उडवत असतात. अशातच सामंतानी गोगावलेबाबत महाड येथे स्पष्टीकरण दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT