Uday Samant, Raj Thackeray And Uddhav Thackeray sarkarnama
कोकण

Uday Samant : 'राज ठाकरे अटी-शर्ती मानणारे नाहीत... यामुळे'; ठाकरे बंधूच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर सामंतांचा दावा

Uday Samant On Raj Thackeray And Uddhav Thackeray : राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना टाळी दिल्याने आता राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या टाळीला ठाकरे गटाकडून पसंती मिळत असतानाच मनसेतील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी विरोध केल्याचे दिसत आहे.

Aslam Shanedivan

Mumbai News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या घडामोडी होताना दिसत आहेत. अनेक बडे नेते सध्या सत्तेच्या वाटेवर स्वार झाले असून काही मार्गस्थ आहेत. याचदरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्यातील मतभेद बाजूला ठेवून मनोमिलनाची तयारी दाखवली आहे. यावरून मनसेतील दुसऱ्या फळीतील नेत्यांसह भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील काही नेत्यांनी विरोध दाखवला आहे. तर राज ठाकरे अटी-शर्ती मानणारे नसून शाळकरी मुलांप्रमाणे उद्धव ठाकरे अटी घालत असल्याची टीका उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. ते सोलापूर दौऱ्यात शिवसेनेच्या आयोजित कार्यक्रमानंतर बोलत होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आपले वाद किरकोळ असून ते महाराष्ट्रापेक्षा मोठे नाहीत. यामुळे महाराष्ट्र, मराठीच्या मुद्द्यासाठी माझी एकत्र येण्याची तयारी आहे. पण फक्त माझी इच्छा असून उपयोग नाही. तर त्यांनाही माझ्याबरोबर काम करण्याची इच्छा असायला हवी. हा इच्छेचा प्रश्न आहे, असे म्हटलं होतं. यावर उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरेंच्या वक्तव्याला प्रतिसाद दिला होता. तर मी सुद्धा महाराष्ट्रासाठी किरकोळ वाद मिटवायला तयार आहे. पण फक्त एका अटीनंतर म्हणत टाळी दिली होती.

यानंतरच आता आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राज-उद्धव एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सामंत यांनी, राज ठाकरे अशा कुठल्याही अटी-शर्तींना मानणारे नेते नाहीत. त्यामुळे ही यती होणे शक्य नसल्याचा दावाही सामंत यांनी केला आहे.

तर उद्धव ठाकरे हे शाळकरी मुलांप्रमाणे अट घालत असून त्या अटी शर्थींवर राज ठाकरे तडजोड करतील, असेही आपलेल्या वाटत नसल्याचेही सामंत यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांचा एक विचार असून ते आपल्या मतावर ठाम राहणारे नेते आहेत. मी त्यांना ओळतो. त्यांना कोणी झुकवून युती करू म्हणत असेल तर ते शक्य नाही, असेही त्यांनी म्हटलं आहे.

त्यांनी, यावरून खोचक टीका करताना, आम्हाला कोणाबद्दल पोटदुखी नाही. स्थानिकांना नव्याने सामावून शिंदे साहेबांनी घेतले असून मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे हे स्वतःचे विचार असलेले एक नेतृत्व आहे. पण आता त्यांना अटी घातल्या जात आहेत. त्यांनी बीजेपीबरोबर बोलायचं नाही, देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बोलायचं नाही. शिंदेंची सावली पडता कामा नये. दिल्लीतील लोकांच्या संपर्कात राहता कामा नये. हा क्रीडा महोत्सव चालू आहे का? युती म्हणून दोघे भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला कोणाला अडचण असण्याच कारण नाही. मात्र त्यांचा स्वभाव बघता असं होईल असं वाटतं नाही, असेही सामंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या सुरू झालेल्या चर्चेवर मनसेकडून मोठा विरोध होताना दिसत आहे. यावरून 29 तारखेपर्यंत कोणीही बोलू नका, अशा सक्त सूचना राज ठाकरेंनी दिल्या आहेत. मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी याबाबत माहिती दिली असून राज ठाकरे सध्या परदेशात आहेत. तर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीचा विषय संवेदनशील आहे. यामुळे कोणीही यावर बोलू नका, अशाही सूचना राज ठाकरेंनी केल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT