Uddhav Thackeray, Uday Samant, Eknath Shinde Sarkarnama
कोकण

उदय सामंतांची एकाच वेळी टीका अन् दावाही, ठाकरेंचा शिलेदारही भडकला; म्हणाला, 'त्यांचे फडणवीसांशी संधान...'

Bhaskar Jadhav On Uday Samant : नाशिकमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा नाही तर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख केला. तर त्यांनाच मुख्यमंत्रीपदी बसवावे, असे वक्तव्य केलं होते. त्यावरून आता राज्यात वाद सुरू झाला आहे.

Aslam Shanedivan

Summary :

  1. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करावे असे वक्तव्य करून राजकीय वाद पेटवला.

  2. भास्कर जाधव यांनी सामंतांवर फडणवीसांच्या बाजूने असल्याचा आणि चालाक असल्याचा आरोप केला.

  3. महायुतीत पुन्हा एकदा अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत.

Ratnagiri News : राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी पडणारे वक्तव्य केले आहे. नाशिकमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी एकनाथ शिंदे यांनीच मुख्यमंत्रीपदी बसवावे, असे वक्तव्य केले आहे. तसेच ठाकरे काँग्रेसचे बाहुले झाल्याची देखील टीका सामंत यांनी केली होती. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. भास्कर जाधव यांनी, उदय सामंत यांच्यात देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात बोलण्याचे धाडस नसून ते चालाक व्यक्ती आहेत. पण त्यांनी असे विधान करण्यामागे त्यांचे फडणवीसांशी संधान असल्याचेही टीका केली आहे. (Uday Samant’s CM Statement Triggers Row, Bhaskar Jadhav Accuses Him of Siding with Fadnavis)

उदय सामंत यांनी, राज्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णयामुळेच राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्याचा दावा केला. त्यावेळी उपस्थित पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकनाथ शिंदे विराजमान व्हावे, अशी मागणी केली. त्यावर ही फक्त आपलीच नाही तर सर्वांची इच्छा असल्याचे सांगितले. यावरून आता महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे.

दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई महापालिकेसाठी दोन्ही ठाकरे एकत्र येणार आहेत. यावरून देखील त्यांनी जोरदार टीका करताना, शिंदे यांनी भल्याभल्यांचे विसर्जन केले असून उरलेसुरले विसर्जन या निवडणुकीत होईल. याच्याआधी नाशिकमध्ये शिवसेना (उबाठा) पक्ष व मनसेच्या मनोमिलनाने काय सिद्ध केले ते सर्वांनाच माहित असल्याचा टोलाही त्यांनी लगावला होता. तर दिल्लीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले आहेत. त्यांच्याबद्दल आपण काय बोलणार? जे दिल्लीत जाऊन सहाव्या रांगेत बसतात, त्यांच्यावर काय बोलणार. ते काँग्रेसचे बाहुले झाल्याची टीका सामंत यांनी केली.

या टीकेला आता भास्कर जाधव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं असून उदय सामंत यांच्या मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, सामंत असे डायरेक्ट बोलतील असे आपल्याला वाटतं नाही. त्यांच्यात फडणवीस यांच्या विरोधात बोलण्याचे धाडस नाही. ते एकदम चालाख असून ते सगळ्यांना सांभाळण्यात त्यांचा कोणी हात धरत नाही. त्यांनी फडणवीस यांच्याशी संधान बांधलं असून त्यानंतरच अशी वक्तव्य समोर येत आहेत. एकीकडे ते शिंदेंचे आमदार आणि मंत्री म्हणून वावरत आहेत. तर दुसरीकडे ते खरंही बोलत आहेत. कारण माझं ही तेच म्हणणे असून हीच वस्तुस्थिती असल्याचेही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

FAQs :

प्र.१: उदय सामंत यांनी नेमकं काय विधान केलं?
उ: त्यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचे समर्थन करणारे वक्तव्य केले.

प्र.२: भास्कर जाधवांनी कोणते आरोप केले?
उ: त्यांनी सामंतांवर फडणवीसांच्या संधानात असल्याचा आणि देवेंद्र फडणवीसांविरोधात बोलण्याचे धाडस नसल्याचा आरोप केला.

प्र.३: या वादाचा महायुतीवर काय परिणाम होऊ शकतो?
उ: अंतर्गत गटबाजी वाढू शकते आणि राजकीय समीकरणांवर परिणाम होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT