खेड नगरपालिका निवडणुकीत शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्जांसाठी मोठी गर्दी झाली.
शिवसेनेच्या माधवी बुटाला यांच्या उमेदवारीनंतर भाजपनेही स्वतंत्र उमेदवार उतरवल्याने महायुतीत तणाव निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी मुंबईत विनय नातू यांची भेट घेऊन राजकीय चर्चा तापवल्या आहेत.
Khed Municipal Election News : खेड नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजले असून शेवटच्या दिवशी नगराध्यक्षा पदाबरोबरच नगरसेवकांच्या जागेसाठी अर्ज भरण्यासाठी झुंबड उडाली होती. पण महायुतीत नगराध्यक्ष पदावरून अंतर्गत वाद असल्याचे आता समोर आले आहे. येथे मंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या माधवी बुटाला यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता. पण आता भाजपने देखील आपला उमेदवार मैदानात उतरवत खेळी खेळली आहे. यामुळे येथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाली आहे. ज्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी मुंबईत धाव घेत भाजप नेते माजी आमदार विनय नातू यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उत आला आहे.
जिल्ह्यातील 4 नगरपालिका आणि 3 नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी निवडणूक जाहीर झाला असून अखेरच्या दिवशी उमेदवारांनी त्यांचे अर्ज दाखल केले. यावेळी खेडमध्ये महायुती जाहीर झाली असतानाही भाजपने वेगळी भूमिका घेतली. तसेत नगराध्यक्ष पदासह इच्छुक 15 उमेदवारांचे अर्ज दाखल केले. तर नगराध्यक्ष पदासाठी भाजप नेते वैभव खेडेकर यांनी त्यांच्या पत्नी वैभवी खेडेकर यांचा अपक्ष म्हणून नअर्ज दाखल केला आहे. यामुळे महायुतीत काहीच अलबेल नसल्याचे बोलले जात आहे.
या निर्माण झालेल्या राजकीय पेचानंतर उदय सामंत यांनी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र रवींद्र चव्हाण हे बंगल्यावर नव्हते. यावेळी मंत्रालयासमोर असणाऱ्या चव्हाण यांच्या बंगल्यावर माजी आमदार डॉ. विनय नातू असल्याची माहिती मिळताच ते तिकडे वळाले. डॉ. नातू हे भाजपचे उत्तर रत्नागिरी निवडणूक प्रमुख असून सामंत यांनी त्यांच्याशी खेडमध्ये उद्भवलेल्या प्रश्नावर चर्चा केलीय.
याबाबत स्वत: उदय सामंत यांनी माहिती दिली असून ते म्हणाले, डॉ. नातू हे भाजपचे उत्तर रत्नागिरी निवडणूक प्रमुख आहेत. त्यांच्याशी आता चर्चा झाली असून बुधवारी पुन्हा आम्ही रत्नागिरीत भेटणार आहोत. खेडसह इतर ठिकाणी काही अडचणी असल्यास त्यावर चर्चा होणार आहे. त्याबाबत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर आम्ही चिपळूण, गुहागरसह खेडमध्ये जाणार आहोत.
खेडमध्ये जो निर्माण झालेल्या वाद आहे. त्यावर चर्चा केली जाईल. येथे येण्यापूर्वीच मंत्री योगेश कदम यांचीशी चर्चा केली असून नेमका वाद काय आहे. ते जाणून घेतले आहे. आता त्यांच्यासह रत्नागिरीत डॉ. नातू यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि तो प्रश्न मार्गी लावू असेही सामंत यांनी यावेळी म्हटलं आहे.
काय आहे खेडमध्ये वाद?
खेड नगरपालिकेत महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची घोषणा मंत्री योगेश कदम यांनी केली. तसेच येथील नगराध्यक्षपद शिवसेनेला देण्यात आले. 20 नगरसेवकपदांच्या नगर पालिकेत भाजपला फक्त 3 जागाच देण्यात आल्याने शिवसेना-भाजपमध्ये मतभेद उफाळून आले आहेत. माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या भाजप प्रवेशानंतरच भाजपची ताकद वाढली असून त्या प्रमाणे योग्य जागा आणि नगराध्यक्ष पदावर भाजपने दावा केला होता.
मात्र त्याकडे न बघताच भाजपला विश्वासात न घेता जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यात आला. ज्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्यासह माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राजीनामे देवू असा इशाराही दिला होता. तर काहींना राजीनामे देत शिवसेना आणि योगेश कदम यांच्यावर टीका केली होती.
FAQs :
शिवसेना आणि भाजप दोघांनीही नगराध्यक्षपदासाठी स्वतंत्र उमेदवार उभा केल्याने महायुतीतील तणाव वाढला.
त्या शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या पक्षाच्या उमेदवार आहेत.
आंतरिक असंतोष आणि नगराध्यक्षपदावर हक्क सांगण्यासाठी भाजपने पाऊल उचलल्याचे चर्चेत आहे.
भाजपच्या हालचालींबाबत चर्चा किंवा समन्वयासाठी त्यांनी भेट घेतल्याची शक्यता वर्तवली जाते.
होय, महायुतीतील कलहामुळे विरोधकांना फायदा आणि मतविभाजन होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.