Uddhav Thackeray Ganpat Gaikwad Eknath Shinde Sarkarnama
कोकण

Uddhav Thackeray : गायकवाडांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; उद्धव ठाकरे सवाल उपस्थित करत म्हणाले, "मग..."

Uddhav Thackeray On Ganpat Gaikwad Firing : "भाजप आमदारानं केलेल्या गोळीबाराचं समर्थन अजिबात करत नाही, पण...", असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

सरकारनामा ब्युरो

Uddhav Thackeray On Eknath Shinde : भाजप आमदार गणपत गायकवाड ( Ganpat Gaikwad ) यांनी शिवसेना शिंदे गटातील शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या गोळीबार केला होता. या गोळीबारानंतर गणपत गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. हाच मुद्दा घेऊन शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी मुख्यमंत्र्यांसह भाजपावर हल्लाबोल केला आहे. "गायकवाडांनी म्हटलंय, त्यांचे करोडो रूपये मिंधेंकडे आहेत. याची चौकशी कोण करणार? गृहमंत्री कुठे आहेत?" असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

( राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! )

रत्नगिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात 'जनसंवाद'च्या माध्यमातून कणकवलीत उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. उद्धव ठाकरे म्हणाले, "भाजप आमदारानं गोळीबार केलेल्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे. मी गोळीबाराचं समर्थन अजिबात करत नाही. पण, एखाद्यावर गोळीबार केल्यानंतर खूनाच्या प्रयत्न केल्याप्रकरणी तुरूंगात जावं लागतं, एवढी अक्कल गणपत गायकवाडांना नसेल का?"

"गोळीबार केल्याचं गायकवाडांनी कबूल केलं होतं, पण..."

"गोळीबाराच्या घटनेचं सीसीटीव्ही व्हिडीओ कुणी समोर आणला? सीसीटीव्ही व्हिडीओची गरज नव्हती. कारण, गोळीबार केल्याचं गायकवाडांनी कबूल केलं होतं. पण, गायकवाडांनी गोळ्या का घातल्या? यात दोन गोष्टी आहेत. एकतर नैराश्य आल्यानंतर माणूस आत्महत्या करतो. अन्यथा डिवल्यानंतर एखादा कुणीतर खूनाचा प्रयत्न करतो," असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

"भाजपामधून कोण या प्रकरणावर बोललं का?"

"गणपत गायकवाडांनी सांगितलं की, 'पोलीस ठाण्याच्या दारात मुलाला धक्काबुक्की केल्याचं सहन न झाल्यानं गोळ्या घातल्या. तसेच, त्यांचे करोडो रूपये मिंधेंकडे आहेत.' याची कोण चौकशी करणार? आपले गृहमंत्री कुठे आहेत? भाजपामधून कोण या प्रकरणावर बोललं का?" अशा प्रश्नांची सरबत्ती उद्धव ठाकरेंनी केली आहे.

"गृहमंत्री कुठे आहेत?"

"मिंधे सेना ही शिवसेना नाही. हा शिवसेनेच्या गुंडावर हल्ला नाही. शिवसेनेत गुंड नाहीत. शिवसेनेत सैनिक आहेत. शिवसेनेची बदनामी करू नका. असे गुंड पोसण्यासाठी बाळासाहेबांनी शिवसेना काढली नव्हती. अन्यायावरती वार करणारे म्हणून शिवसैनिक प्रसिद्ध आहेत. पण, भाजपा आमदारावर दयनीय परिस्थिती आली असताना गृहमंत्री कुठे आहेत?" असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

"...तर दगडांच्या देशाची ओळख गुंडांच्या देशा करतील"

"गणपत गायकवाडांनी म्हटलं की, 'मिंधे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रात गुंडांची पैदास होईल.' मग, राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशाची ओळख हे गुंडांच्या देशा करतील. आपल्याला हे चालेल का?" असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT