Sambhajinagar : Uddhav Thackeray Sarkarnama
कोकण

Uddhav Thackeray : 'चिन्ह' चोरलं तरी जिंकलोच, गद्दारांनी आम्हाला शिवसेना शिकवू नये ; ठाकरेंचा तुफान हल्लाबोल!

Uddhav Thackeray Rally in Kokan : देशद्रोही बोलशीलच कसा, जीभ हासडून ठेवू...

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray Rally in Kokan : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज खेडमध्ये माजी आमदार संजय कदम यांच्या प्रवेशानिमित्त सभा झाली . माजी मंत्री रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव योगेश कदम यांच्या होम ग्राउंडवर ठाकरेंची सभा होत आहे. यावेळी सभेला मोठी गर्दी झाली होती. यावेळी ठाकरेंनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, "मुंबईनंतर शिवसेनेचा भगवा पहिल्यांदा या कोकणात फडकला. पण हे गद्दार यांना यांच्या आईवडीलांच्या नावाची लाज वाटत, नसेल तर त्यांच्या आईवडीलांची नावं द्यावी. आपला पक्ष शिवसेनेचं नाव गोठवलं, चिन्ह बदललं तरी अंधेरीत जिंकलो. हे गद्दार आपल्याला शिवसेना काय शिकवणार? मी राज्याचा मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात उद्यागधंदे येत होते. गद्दारांच सरकार आलं, उद्योग महाराष्ट्राच्याबाहेर जावू लागले. आज कर्नाटक राज्य आपल्याला डोळे दाखवू लागला. आणि हे गद्दार शेपट्या घालत होते. केवळ हिंदुत्वासाठी शिवसेनेनं भाजपला डोक्यावर घेतलं होतं. "

ठाकरे पुढे म्हणाले, "घरी होतो म्हणून माझ्यावर टीका करत होते. हो मी कोव्हिडमुळे मी घरात होतं, पण घरी राहून मी महाराष्ट्र सांभाळला. तुम्ही ज्यांना मंत्रीपद मिळाले नाही, खोके मिळाले नाही. त्यांना सांभाळा. मी मुख्यमंत्री असताना, कोव्हीडमध्ये मृतदेहाची विटंबना झाली नाही. योगीच्या सरकारमध्ये मात्रमृतदेहाची विटंबना झाली. याकडे पाहणार की नाही? निवडणुका जिकडे उद्योगधंदे तिकडे. आधी गुजरातमध्ये उद्योगधंदे पळवले. आता कर्नाटकमध्ये उद्योग नेले जात आहेत. महाराष्ट्र सरकारचं जाहीरात तुटलेल्या फुटलेल्या एसटी बसवर केले जात आहेत. गतिमान महाराष्ट्र तुटलेल्या बसवर. यांना लाज नाही, शरम नाही. "

"माझे कुटुंब माझी जबाबदारी आहेच. मात्र जे कुटुंब बदलतात, ते महाराष्ट्राचं काय कुटुंब काय सांभाळणार? कसली काळजी घेणार? देशद्रोही सोबत चहापान असे ते आधी बोलले. नंतर ते म्हणाले, नाही नाही तसं नाही. आम्हाला देशद्रोही बोलशीसच कसं? जीभ हासडून ठेवू.माझ्याकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आले होते. आपल्या सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे. देश वाचवायला महाराष्ट्र सर्वात पुढे येईल," असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT