Chinchwad : अजित पवार - राहुल कलाटे - नाना काटे रात्री दोन वाजेपर्यंत एकत्र बसले : मार्ग का निघाला नाही?

Chinchwad By Election Result : तिघांमध्ये रात्रभर चर्चा, दोघांपैकी एकाने लढवा, पण...
Chinchwad By Election Result : Ajit Pawar : Rahul Kalate n: Nana Kate
Chinchwad By Election Result : Ajit Pawar : Rahul Kalate n: Nana Kate Sarkrnama

Chinchwad By Election Result : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीच्या पराभवाभोवती चर्चा घडून येताना दिसून येत आहे. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यामुळे महाविकास आघाडी विजयापासून 'वंचित' राहिली असे, अनेक विश्लेषण व्यक्त होऊ लागले आहेत. दरम्यान कलाटे यांना उमेदवारी देण्याबाबत विरोधीपक्ष अजित पवार आग्रही होते अशी चर्चा होत होती. यावर आता स्वत: अजित पवार (Ajit Pawar) यांनी मौन सोडले आहे.

Chinchwad By Election Result : Ajit Pawar : Rahul Kalate n: Nana Kate
Mp Sanjay Jadhav News : जाधवांच्या मनातले ओठावर आले, आता निष्ठेचे काय ?

अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना कलाटे यांच्या उमेदवारीबद्दल भाष्य केले आहे. 'चिंचवड विधानसभा निवडणुकीत एक चर्चा अशी होती की, ठाकरे गटाचे नेते राहुल कलाटे यांच्याकडे तुमचा थोडा झुकाव होता. तुम्हाला वाटत होतं की, राहुल कलाटेंना पक्षाची उमेदवारी द्यावी. कारण मागील निवडणुकीतही त्यांनी चांगली मते घेतली होती. पण, तुमच्यावर काही दबाव होता का? असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला.

Chinchwad By Election Result : Ajit Pawar : Rahul Kalate n: Nana Kate
Prakash Ambedkar News : वंचितमुळे चिंचवडमध्ये नाना काटेंचा पराभव? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टचं सांगितलं..

यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, "आमच्यावर असा कोणाचा दबाव नसतो. आम्ही निर्णय घेताना सगळे मिळून निर्णय घेतो. उमेदवारी फॉर्म भरायच्या दिवशी मी स्वत: पवार साहेब, उद्धव ठाकरे, जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली होती."

"आदल्या रात्री दोन वादेपर्य़ंत पुण्यामध्ये आम्ही सर्व जण होतो. विलास लांडे, संजोग वाघेरे, अजित गव्हाणे, नाना काटे, राहुल कलाटे आम्ही सगळे जण बसलो होतो. यातून मार्ग निघावा, दोघांपैकी एकाने लढवावी. पण दुर्दैवाने यातून मार्ग निघाला नाही," असे अजित पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com