Ratnagiri Politics News :
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी हा दौरा आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांच्या दौऱ्यावर पक्षप्रमुख Uddhav Thackeray येत आहेत, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे. तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी विद्यमान खासदार विनायक राऊत यांना जवळजवळ निश्चित झाल्याचे Vaibhav Naik त्यांनी सांगितले.
शिवसेनेच्या अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे स्वतः दौरा करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून ते आता 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी कोकण दौऱ्यावर येत असल्याची माहिती आमदार नाईक यांनी दिली.
सिंधुदुर्ग किल्ल्यावर आमदार फंडातून झालेल्या सिंहासनाचे पूजन यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हावे, अशी शिवप्रेमींची इच्छा होती. त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सिंहासनाचे पूजन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. यावेळी उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार असून मनमोकळेपणे संवाद साधणार आहेत, असे नाईक म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात या खासदार विनायक राऊत यांच्या उमेदवारीची घोषणा होणार असल्याची माहिती आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विनायक राऊत यांनी यापूर्वीच तयारी सुरू केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजप, राष्ट्रवादी या महायुतीकडून अद्याप कोणताही अधिकृत उमेदवार घोषित झालेला नाही. पण रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेकडून विनायक राऊत यांची उमेदवारीची औपचारिक घोषणा बाकी आहे.
महायुतीकडून शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण ऊर्फ भय्या सावंत यांचे नाव चर्चेत असले तरी भाजपचे सार्वजनिक बांधकाममंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचेही नाव आघाडीवर आहे. त्यामुळे महायुतीकडून या मतदारसंघात कोण मैदानात उतरणार? याची उत्सुकता आहे.
edited by sachin fulpagare
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.