Ratnagiri News : कोकणात राणे व भास्कर जाधव हा वाद जुना आहे. राणे व जाधव एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर रविवारी पुन्हा एकदा भाजपाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी टीकास्त्र सोडले आहे.
याशिवाय लोटे येथील गोशाळा व आमदार भास्कर जाधव हा वादही जुना आहे हाच संदर्भ घेत कोकरे महाराज काळजी करू नका, आपल्यासमोर कोणीही शेठफेट चालत नाही. सगळ्यांचे गेट बंद. सोडणार नाही, असे म्हणत निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे. खेड तालुक्यात लोटे येथे भगवान कोकरे महाराज यांच्या राष्ट्रीय गोशाळेच्या कार्यक्रमप्रसंगी निलेश राणे बोलत होते.(Nilesh Rane Vs Bhaskar Jadhav)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यावेळी निलेश राणे(Nilesh Rane) म्हणाले, 'कोकरे महाराज तुम्ही काळजी करू नका. अचानकपणे हे माझ्याकडे आले आणि सांगितले की, वारकरी संप्रदाय मोठ्याप्रमाणात आहे, या सगळ्यांना मी एकत्र करतो. त्यानंतर एका मोठ्या वारकरी संप्रदायाच्या एका कार्यक्रमाला मला इथे बोलावलं. तसेच, कधी एक रुपयाची मागणीही केली नाही या माणसाने.' अशा शब्दात गोशाळा चालक कोकरे महाराज यांचे त्यांनी कौतुक केलं आणि भगवान कोकरे महाराज गोसेवा करत आहेत त्यांना नाही मदत करायची तर कोणाला करायची? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
याचबरोबर, 'तुम्हाला हवय काय जमीनच ना? नाही देत जा. असं भास्कर जाधवानां(Bhaskar Jadhav) उद्देशून विधान निलेश राणे म्हणाले. तसेच ही जमीन गाईंसाठी आहे, गाईंच्या रक्षणासाठी आहे ती इतर कोणत्याही कामासाठी जाऊ देणार नाही. अशी मागणीही आम्ही केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे आणि हे प्रस्तावही वरती गेले आहेत. म्हणून कोकरे महाराज तुम्ही काळजी करू नका कोणी शेठ,फेट आपल्यासमोर चालत नाही सगळ्यांचे गेट बंद.' अशा शब्दात निलेश राणे यांनी आमदार भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला.
याशिवाय भास्कर जाधव यांची ॲक्शन करत कॅमेरा सुरू झाले की मी निखारा... असा टोलाही भास्कर जाधव यांना लगावला आणि म्हटले की, 'म्हणे मी निखारा नाही विझवला ना तुला एक दिवस... अन् या जन्मातच विझवणार राणेंना दुसरा जन्मच माहिती नाही. जे करणार ते याच जन्मातच करणार सोडणार नाही. असा असं थेट इशाराही निलेश राणे यांनी भास्कर जाधवांना यावेळी दिला. तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांचा उल्लेख करत मी साठे यांना सांगितलं पक्षाला सांगा मला प्रभारी करा मी उद्यापासून सामान घेऊन येतो गुहागरमध्ये आणि याला पुन्हा घरी पाठवू. अशा शब्दात निलेश राणे यांनी आमदार भास्कर जाधव यांच्यावर तोफ डागली आहे.
'आपण सोज्वळ माणूस आहे वाकूनच काम करतो, तुम्ही हसताय असं काही नाही, पण जिथे वाकडा आहे तिथे वाकडा आहे तिथे तडजोड नाही हे राणे साहेबांचे संस्कार आहेत. जिथे शब्द चालत नाही तिथे बाकीचे सगळे उपाय... पण लोकांना न्याय दिलाच पाहिजे. जनतेपर्यंत न्याय हा पोहोचलाच पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही.' असं सांगत गोशाळा चालवणाऱ्या भगवान कोकरे महाराज यांना निलेश राणे यांनी आश्वस्त केले.
(Edited by- Mayur Ratnaparkhe)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.