Uddhav Thackeray, Narayan Rane, Deepak Kesarkar  Sarkarnama
कोकण

Uddhav Thackeray News : सुपडा साफ करणार; राणे, केसरकरांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गरजले

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray Sawantwadi News :

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची रविवारी आज पहिली सभा सावंतवाडी येथे झाली. या सभेत त्यांनी अपेक्षेप्रमाणे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर, भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांना खुर्ची मिळत असेल. पण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का कधीच पुसला जाणार नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. आता हे सगळे मतदारसंघ साफ करून टाकायचे आहेत, असेही आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिले.

दर पंधरा दिवसांनी शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला जातात. मी सुद्धा माणूस बरा दिसतो म्हणून घेतला होता. आल्याबरोबर त्याला उमेदवारी दिली. तुम्ही सुद्धा त्यावेळेला त्याला निवडून दिला. मी त्याला त्यावेळेला मंत्री केलं. पण पुन्हा त्यांनी गद्दारी केली. गद्दारी त्यांच्या नसानसात भिनली म्हटल्यावरती गद्दार तो गद्दरच. कधी इमानदार होऊच शकत नाही, अशा शब्दांत Uddhav Thackeray यांनी शिंदेंचे मंत्री दीपक केसरकर यांचा समाचार घेतला.

उल्हासनगरमधील पोलिस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराचा मुद्दाही ठाकरेंनी उपस्थित केला. हा गोळीबार कोणी केला? याचा आवाज तुमच्यापर्यंत आला ना. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही जर का विनायक राऊत सारखी माणसं निवडून दिली नसती तर आज कोकणाची काय हलत झाली असती? असा प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केला आणि भाजपवरही निशाणा साधला आहे.

त्याच वेळेला तुम्ही गुंडाला चेचून टाकलं, ठेचून टाकलं. आता जी काही वळवळ एका मतदारसंघात राहिली आहे, ती सुद्धा सुपडा साफ करून टाकायची, अशा शब्दात त्यांनी समाचार घेतला. मंदिरात चकचकीत लादीचे साफसफाई करतानाचे मोदींचे फोटो आले. याचप्रमाणे कोकण साफ करून टाकायचं. तो झाडू घेऊन आता एक मतदारसंघ राहिला आहे. तो सुद्धा साफ करून टाकायचा आहे. सावंतवाडी तर करायचीच. पण बाजूचा मतदारसंघही साफ करायचा, असाही टोला उद्धव ठाकरे यांनी मंत्री दीपक केसरकर व आमदार नितेश राणे यांना लगावला आहे.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! )

आमदार वैभव नाईक यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. गेल्या वेळेलाच एक मतदारसंघ साफ केला आहे. विनायक राऊत यांनीही हेच काम गेल्यावेळी केले आहे, अशा शब्दांत ठाकरे यांनी राणेंवर तोफ डागली.

जनसंवाद हा शब्दच आपण काढून टाकला आहे. तुम्ही मला कुटुंबातला सदस्य मानता, हे माझ्यासाठी भाग्य आहे. मन की बात वगैरे सगळं तिकडं, असा टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. आपल्याकडे 'दिल की बात'. मनामध्ये काळबेर असू शकतं. पण हृदयात नाही. आमच्या हृदयामध्ये राम आणि हाताला काम असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.

edited by sachin fulpagare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT