Uddhav Thackeray: ठाकरेंच्या दौऱ्याआधी वातावरण तापलं; कुडाळची सभा उधळणार?

Kokan Politics: शिवसेना-भाजपमध्ये राजकीय संघर्ष सुरू
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri: उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग या कोकण दौऱ्यावर येत आहेत, ठाकरेंच्या दौऱ्याआधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे यांच्या कुडाळ येथील कॉर्नर सभेत भाजपा व आमच्या नेत्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्यास आम्ही सभा उधळून लावू ,असा थेट इशाराच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

याबाबत कुडाळ पोलिस निरीक्षक कृणाल मुल्ला यांना सभा वर्दळीच्या ठिकाणी घेऊ नये असे निवेदनही दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना-भाजपमध्ये राजकीय संघर्ष सुरू झाल्याचे चित्र आहे.

उद्धव ठाकरे यांच्या कुडाळमध्ये होत असलेल्या सभेला आमचा विरोध नाही. मात्र सभा जिजामाता चौक कुडाळ येथील शहरात येणाऱ्या मुख्य मार्गावर असून कुडाळ पोलिस निरीक्षकांना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.तेथे गर्दी झाल्यानंतर वाहतुकीस अडथळा होणार आहे, त्यामुळे येथे सभा आयोजित केल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करावा. ही सभा अन्य ठिकाणी घेण्यासाठी आयोजकांना सूचित करावे असे निवेदनात नमूद केले आहे.

सभेच्या अनुषंगाने शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून जी पत्रके वाटण्यात येत आहेत, त्या पत्रकांवर भाजपाच्या झेंड्याबद्दल आक्षेपार्ह विधान छापलेले आहे. त्यामुळे या संदर्भात संबंधितावर गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षक मुल्ला यांच्याकडे केली.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! )

Uddhav Thackeray
Satara News: साताऱ्यात महायुती एकवटली, महाविकास आघाडीचे काय?

कुडाळ शहराध्यक्ष राकेश कांदे यांनी सांगितले की, गेल्या वेळी रस्त्याला पडलेले खड्डे बुजवताना आम्हा नगरसेवकांवर वाहतुकीस अडथळा केल्याप्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता असाच गुन्हा सभेच्या वेळी वाहतुकीला अडथळा झाल्यानंतर या सभा घेणाऱ्यांवर करण्यात यावा. याबाबत सभेच्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. बंदोबस्तातही वाढ करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मुल्ला यांनी दिली आहे.

निवेदन देताना भाजपाचे नगरसेवक नीलेश परब, अॅड. राजीव कुडाळकर, नगरसेविका प्राजक्ता शिरवलकर, चांदनी कांबळी, कुडाळ शहराध्यक्ष राकेश कांदे, माजी - नगरसेवक सुनील बांदेकर, राकेश नेमळेकर, चंदन कांबळी तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com