Uddhav Thackeray Konkan News
Uddhav Thackeray Konkan News Sarkarnama
कोकण

Uddhav Thackeray : ठाकरेंनी शिंदे गटातील आणखी एका आमदाराला घेरले; गोगावलेंच्या बालेकिल्ल्यात जगतापांचा प्रवेश अन् सभाही...

Amol Jaybhaye

Uddhav Thackeray Konkan News : महाडच्या माजी नगराध्यक्षा व काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस स्नेहल जगताप आज (ता. ६) शिवसेना उध्दव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. या निमित्ताने शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्या मतदार संघात ठाकरे गट शक्तीप्रदर्शन करणार आहे.

या वेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेत ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. महाडमधील चांदे क्रिडांगणावर उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. यावेळी स्नेहल जगताप, काँग्रेसचे (Congress) जिल्हा उपाध्यक्ष हनुमान जगताप व महाड मतदारसंघातील सर्व पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

त्यामुळे महाड मतदारसंघात शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे. महाडचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawle) हे शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर महाड मतदारसंघात ठाकरे गटाची कोंडी झाली होती. मात्र, जगताप यांच्या पक्षप्रवेशामुळे गोगावले यांच्यासमोर कडे आव्हान उभे राहणार आहे. या प्रवेशामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत गोगावले यांची कोंडी जगताप यांच्या माध्यमातून केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

जो संघर्ष माणिक जगताप यांनी केला तसाच संघर्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) करत आहेत. तीच प्रेरणा घेत प्रवाहा विरोधात जात आपण उद्धव ठाकरे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला असल्येचे स्नेहल जगताप यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडी हेच माझे घर असल्याचे जगताप म्हणाला. भविष्यात सर्व आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी आपण सज्ज आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे पर्यायी नेतृत्व तयार करत आहेत. या नेतृत्वाच्या माध्यमातून शिंदे गटातील आमदारांची कोंडी करण्याची रणनिती ठाकरे यांनी आखली आहे. या आधीही त्यांनी अनेक मतदारसंघात माजी आमदारांनी किंवा इतर पक्षातील नेत्यांनी प्रवेश देत शिंदे गटातील नेत्यांसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच प्रमाणे आज गोगावले यांच्या मतदारसंघात ठाकरे सभा घेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT