BJP MP Narayan Rane sarkarnama
कोकण

Narayan Rane : नारायण राणेंसह भाजपची डोकेदुखी वाढणार? शिवसेनेनं रणनीती आखली; नुकताच प्रवेश केलेल्या नेत्यालाच दिली पक्षप्रवेशाची ऑफर

Former MP Vinayak Raut offer to BJP youth leader Vishal Parab : नुकताच भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी खासदार नारायण राणेंना विचारात न घेता युवा नेते विशाल परब यांना पक्षात प्रवेश दिला होता.

Aslam Shanedivan

  1. नारायण राणेंनी भाजपमध्येच वाद आणि मतभेद असल्याचे मान्य करणारे वक्तव्य केलं आहे.

  2. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने चाल खेळत राणेंनी फटकारलेल्या नेत्याला पक्षात येण्यासाठी खुले आमंत्रण दिल्याने सिंधुदुर्गच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

  3. ही ऑफर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.

Sindhudurg News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा बिगूल वाजला असून जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींची रणधुमाळीतच सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपमध्येच काहीच अलबेल नसल्याचे आता समोर येत आहे. नुकताच प्रवेश केलेल्या युवा नेते विशाल परब यांना पक्षाचे खासदार नारायण राणे किंमत द्यायला तयार नाहीत. तसेच त्यांना पक्षाचा कार्यकर्ता मानत नाहीत. उलट ते फक्त भेटू दे मग ब्रेकिंग न्यूज मिळेल असे वक्तव्य करत वादळ निर्माण केले होते. यानंतर विशाल परब कोणता निर्णय घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असतानाच, त्यांना शिवसेनेची ऑफर मिळाल्याचे समोर येत आहे. राणेंनी केलेल्या भविष्यवाणीनंतर हा भाजपसाठी धक्काच आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा बिगूल वाजला असून जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींची रणधुमाळी सुरू झाली आहे. अशातच येथे महायुतीत वाद निर्माण झाला असून एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपने दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे येथे युतीच तुटण्याची शक्यता तयार झाली आहे. पण भाजपचे जेष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणेंनी जिल्ह्यात महायुतीच म्हणून निवडणूक लढवावी, असे निर्देश दिले आहेत.

तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेंसह उदय सामंत यांचे कान टोचत युतीबाबत निर्णय तिन्ही पक्षाचे नेते घेतील. त्यात आपणही असू असे म्हटले होते. तर येथील सावंतवाडीत माजी मंत्री आमदार दीपक केसरकर महायुती टिकावी म्हणून प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र केसरकर यांच्या मागणीला न जुमानता पालकमंत्री राणे यांनी नगराध्यक्ष पदासाठी भाजपचा उमेदवार घोषित केला. यामुळे अडचणी वाढल्या आहेत.

अशातच राणेंनी ज्या युवा नेते विशाल परब यांना आपण जुमानत नाही, त्यांना पक्षाचे कार्यकर्ते मानत नसल्याचे सांगत भाजपमध्येच वाद असल्याचे कबूल केले होते. त्या विशाल परबांना मोठी ऑफर असल्याचे आता समोर आले आहे.

परब यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने खुली ऑफर दिली आहे. या ऑफरनंतर आता सिंधुदुर्गच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ठाकरे शिवसेनेचे सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी ही ऑफर दिली असून त्यांनी ही ऑफर पत्रकार परिषदेतच दिली आहे.

त्यांनी, विशाल परब यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करताना, विशाल परब हे चांगले, कार्यक्षम आणि जनतेत काम करणारी व्यक्ती आहे. पण अशा कार्यकत्यांची कदर काहींना नसते. त्यांनी आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात यावे, अशी ऑफरच दिल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून परब कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. तर सध्या भाजपमध्ये शहकाटशहाचे राजकारण पाहायला मिळत असून नुकताच प्रवेश केलेल्या परब यांच्यावर थेट खासदार राणेंनीच नाराजी व्यक्त केल्याने त्यांना घेण्यासाठी ठाकरेंची शिवसेना सर्सावली आहे.

FAQs :

1) विशाल परबांना नेमकी कशी ऑफर देण्यात आली?

विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत परब यांना शिवसेनेत प्रवेशासाठी उघडी ऑफर दिली.

2) नारायण राणेंनी काय विधान केले होते?

राणेंनी सांगितले की विशाल परब आपले म्हणणे मानत नाहीत आणि ते पक्षाचे कार्यकर्ते नाहीत.

3) ही ऑफर दिल्यानंतर सिंधुदुर्गमध्ये का खळबळ उडाली?

भाजपमधील वाद व शिवसेनेच्या ऑफरमुळे राजकीय समिकरणात मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली.

4) ठाकरे गटाची ही भूमिका कोणत्या नेत्याने स्पष्ट केली?

माजी खासदार व शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी.

5) विशाल परब पक्षांतर करणार का?

अद्याप अधिकृत निर्णय नाही, परंतु चर्चांना वेग आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT