BJP Vs Shivsena : उल्हासनगर महापालिकेच्या तब्बल तीन महिन्यांनी झालेल्या महासभेत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. येथे राज्यात आणि महापालिकेत सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या नगरसेवकांनी महासभेतच दोस्तीत कुस्ती केल्याचे समोर आले. यामुळे महापालिकेतील शिवसेना-भाजपमधील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याची चर्चा आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या महासभेत भाजप गटनेते राजेश वधारिया यांना बोलण्याची संधी दिली होती. पण त्यांचे बोलणं सुरू असतानाच भाजप नगरसेवक प्रधान पाटील मध्येच बोलण्यास उभे राहिले. यावरून वाद सुरू झाला. महापौर अश्विनी निकम यांनी त्यांना खाली बसण्याची सूचना केली. तसेच सभागृहाबाहेर जाण्याचे निर्देश दिले. मात्र, पाटील ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
त्यांनी थेट महापौर अश्विनी निकम यांचा बापच काढणारे वक्तव्य केलं. ज्यानंतर महासभेत शिवसेना आणि भाजपमधील राजकीय संघर्षाचा भडका उडाला आणि सभागृहातच दोन्ही पक्षाचे नगरसेवक आमने सामने आले आणि एकच गोंधळ उडाला. आरोप-प्रत्यारोप आणि शाब्दिक चकमकींनी महासभा गाजली. तर संतापलेल्या महापौर अश्विनी निकम यांनी ‘माझा बाप काढला’ म्हणत पाटील यांचे तीन सभांसाठी निलंबनाचे आदेश दिले.
यानंतर काही काळ सभागृहातील वातावरण तणावपूर्ण झाले असतानाच आता भाजप गटनेते राजेश वधारिया यांचा देखील बेकायदेशीर प्रकार समोर आला आले. पाटील यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे गदारोळ उडाल्याने महापौर निकम यांनी ब्रेक जाहीर करत कामकाज थांबवले.
यावेळी उल्हास नदी घाटाला पर्यटनाचा दर्जा देण्याचा प्रस्तावावर मतदान घेण्याची मागणी करणाऱ्या वधारिया यांनी उपमहापौर अमर लुंड यांना महापौरांच्या खुर्चीत बसवले. तसेच घाईघाईने तो प्रस्ताव मंजूर करून घेतला. मात्र यावर शिंदेंच्या शिवसेनेचे गटनेते अरुण अशान आणि नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी तीव्र आक्षेप घेतला.
महापौर उपस्थित असताना उपमहापौरांना महापौरांच्या खुर्चीत बसून निर्णय घेतलाच कसा असा सवाल केला. तसेच भाजपला देखील धारेवर धरले. दरम्यान आता महासभेत झालेल्या घडामोडीनंतर उल्हासनगरच्या जनतेकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर महापौर आणि भाजप नगरसेवक यांच्यातच संघर्ष उफाळल्याने युतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा चर्चेत आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.