Ambarnath political drama: अंबरनाथ उपनगराध्यक्ष निवडणुकीत मोठा 'ट्विस्ट'! एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; व्हीप झुगारल्यास कारवाईची टांगती तलवार

Political News : अंबरनाथ नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत गेल्या काही दिवसापासून हायव्होल्टेज ड्रामा पाहावयास मिळत आहे.
Mahayuti Municipal Election Victory 2025
Mahayuti Municipal Election Victory 2025Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : अंबरनाथ नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत गेल्या काही दिवसापासून हायव्होल्टेज ड्रामा पाहावयास मिळत आहे. याठिकाणी उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसापासून मोठ्या राजकीय घडामोडी पाहवयास मिळत आहेत. अंबरनाथ नगर परिषदेमध्ये 59 नगरसेवक आहेत. त्यापैकी काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे काँग्रेसने निलंबित केले होते त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

त्यापूर्वी भाजपचे 14, काँग्रेसचे 12 राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 आणि एक अपक्ष असा 31 जणांचा अंबरनाथ विकास आघाडी या नावाने जिल्हाधिकाऱ्यांकडे एक गट रजिस्टर करण्यात आला होता. मात्र तीन दिवसांपूर्वी या गटातील चार नगरसेवकांनी शिवसेनेच्या शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे अंबरनाथमध्ये शिवसेनेचे 27 नगरसेवक आहेत, या नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिल्यामुळे शिंदे गटाचं पारड जड झाले होतं. मात्र आता या निवडणुकीत नगरसेवकांच्या नावाने व्हीप काढण्यात आल्याने शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

अंबरनाथ नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या चार नगरसेवकांनी शिवसेना (Shivsena) शिंदे गटाला पाठिंबा दिला होता, त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचं पारडं जड झालं होतं. मात्र आता अंबरनाथ विकास आघाडीकडून सर्व नगरसेवकांना व्हिप जारी करण्यात आला आहे. व्हीप झुगाराला तर कारवाई करणार, असा थेट इशाराच अजित पवार गटाच्या या चार नगरसेवकांना देण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा या निवडणुकीत आता भाजपाचं पारडं जड झाले आहे.

Mahayuti Municipal Election Victory 2025
BJP vs NCP : 'मोफत शिक्षणाची फाइल अडवणारे, मोफत प्रवास काय देणार? विजयी होणार नाही हे माहिती असल्यानेच अजित पवारांची घोषणा...', भाजपचा हल्लाबोल

अंबरनाथ नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अंबरनाथ विकास आघाडीला मतदान करा नाहीतर कारवाई करण्यात येईल असा थेट इशारा अजित पवार गटाच्या चार नगरसेवकांना अंबरनाथ विकास आघाडीचे गटनेते अभिजीत करंजुलेकर यांनी दिला आहे. त्यांनी रविवारी सर्व नगरसेवकांसोबत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा इशारा दिला आहे, आम्ही सर्व 31 नगरसेवकांना व्हिप जारी केला असून, जर या व्हिप विरोधात कोणी मतदान केले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सांगितल्याची माहिती यावेळी करंजुलेकर यांनी दिली.

Mahayuti Municipal Election Victory 2025
NCP Sharad Pawar: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणतात, भाजपचा ‘हंड्रेड प्लस’ नारा पोकळ ठरणार!

अंबरनाथ नगर परिषदेमध्ये 59 नगरसेवक आहेत, काँग्रेसच्या (Congress) 12 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्यामुळे भाजपचे 14 काँग्रेसचे 12 राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 आणि एक अपक्ष असा 31 जणांचा अंबरनाथ विकास आघाडी या नावाने जिल्हाधिकाऱ्यांकडे एक गट रजिस्टर करण्यात आला होता. मात्र तीन दिवसांपूर्वी या गटातील चार नगरसेवकांनी शिवसेनेच्या शिंदे गटाला पाठिंबा दिला होता.

Mahayuti Municipal Election Victory 2025
Congress Pune Manifesto : 'दिलेला शब्द पाळू...' अधिकारनाम्यातून काँग्रेसचा 'पुणे फर्स्ट'चा नारा

अंबरनाथमध्ये शिवसेनेचे 27 नगरसेवक आहेत, या नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिल्यामुळे शिंदे गटाचं पारड जड झालं होतं. मात्र आता या निवडणुकीत नगरसेवकांच्या नावानं व्हीप काढण्यात आल्यानं शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

Mahayuti Municipal Election Victory 2025
BJP Sujay Vikhe : 'माझा पराभव ‘अहमदनगर’ या नावाने झाला, तरी आपण पळ काढणाऱ्यांपैकी नाही'; तयारीत असल्याचा विखेंचा सूचक इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com