Ulhasnagar BJP Shivsena Political Dispute sarkarnama
कोकण

BJP Vs Shivsena : रवींद्र चव्हाणांवरील आरोप शिवसेना महापौरांच्या पतीला भोवणार? भाजपची पोलिसांकडे धाव; कारवाई न झाल्यास अधिवेशनात मुद्दा उचलणार

Ulhasnagar BJP Shivsena Political Dispute : उल्हासनगरमधील शिवसेना आणि भाजपमधील राजकीय संघर्ष थेट उच्च न्यायालयात गेला असून न्यायालयाने स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्याच स्थगित केल्या आहेत.

Aslam Shanedivan

Ulhasnagar News : उल्हासनगरमधील शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र झाला आहे. युती तोडण्याच्या भाजपच्या घोषणेनंतर आता हा वाद थेट उच्च न्यायालय आणि पोलिसांपर्यंत पोहोचला आहे. महापौर अश्विनी निकम यांनी केलेल्या स्वीकृत नगरसेवक नियुक्त्यांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. त्यातच महापौरांचे पती कमलेश निकम यांच्या एका वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाला असून, दोन्ही पक्षांतील संघर्षाला नवे वळण मिळाले आहे.

स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्यांना हायकोर्टाची स्थगिती

महापौर अश्विनी निकम यांनी केलेल्या स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्यांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. भाजपच्या आक्षेपानंतर हा निर्णय झाल्याने शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे उल्हासनगर महापालिकेतील सत्तासमीकरणांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

रवींद्र चव्हाणांविरोधातील वक्तव्याने वाद

या पार्श्वभूमीवर कमलेश निकम यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चव्हाण यांचे मंचेकर टोळीशी संबंध असल्याचा आरोप निकम यांनी केल्याने भाजपमध्ये संतापाची लाट निर्माण झाली. निकम यांच्या या वक्तव्याविरोधात भाजप पदाधिकारी कपिल अडसूळ आणि मनीष हिंगोरानी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित केला. या व्हिडिओमध्ये कमलेश निकम यांना ‘भेटेल तिथे फटके देणार’ असा इशारा देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उल्हासनगरमध्ये शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष आणखी चिघळला आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडे धाव

कमलेश निकम यांच्या वक्तव्यावरून भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वाधारिया यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेतली. निकम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, भाजप आमदार कुमार आयलानी यांनीही या प्रकरणावर भूमिका घेतली आहे. पोलिसांनी कमलेश निकम यांच्यावर कारवाई केली नाही, तर हा मुद्दा आगामी अधिवेशनात मांडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

‘हत्येचा कट रचला जातोय’; निकमांचा गंभीर आरोप

दुसरीकडे, कमलेश निकम यांनीही भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात गंभीर आरोप केले आहेत. आपल्या हत्येचा कट रचला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. निकम यांनी प्रदीप रामचंदानी, कपिल अडसूळ, मनीष हिंगोराणी आणि अवि पंजाबी यांची नावे घेत त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच रामचंदानी यांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन तपासावे, अशी मागणीही त्यांनी पोलीस उपायुक्तांकडे केली आहे.

युतीचा संघर्ष आता न्यायालय आणि पोलिसांत

उल्हासनगरमध्ये शिवसेना आणि भाजपमधील राजकीय संघर्ष आता केवळ आरोप-प्रत्यारोप आणि युतीतील मतभेदांपुरता मर्यादित राहिलेला नाही. स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्यांचा मुद्दा उच्च न्यायालयात गेला आहे, तर कमलेश निकम यांच्या वक्तव्यावरून दोन्ही बाजूंनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT