BJP & Shivsena Dispute : भाजप - शिवसेना युतीत 'महाभारत' घडविणाऱ्या 'त्या' जाहिरातींवर 10 ते 15 कोटी खर्च ?

Political News : शिवसेना शिंदे गट आणि भाजप युतीची झळकलेली जाहिरात अनेक वृत्तपत्रांची हेडलाईन झाली.
BJP & Shivsena Dispute
BJP & Shivsena DisputeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai : शिवसेना शिंदे गट आणि भाजप युतीची झळकलेली जाहिरात अनेक वृत्तपत्रांची हेडलाईन झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या जाहिरातमध्ये फोटो नसल्यानं या जाहिरातीनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. भाजपच्या काही नेत्यांनी यावरुन नाराजी व्यक्त केली होती. मात्र, या जाहिरातीचा एकूण खर्च किती असेल असा प्रश्न जनतेला पडला होता. मंगळवारी आणि बुधवारी देण्यात आलेल्या जाहिरातींचा खर्च कोटीच्या घरात असल्याची माहिती समोर येत आहे.

शिवसेना(Shivsena) शिंदे गटाकडून राज्यातील जनतेचा कौल घेण्याकरिता सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेमध्ये जनतेनं सर्वाधिक पसंती भाजप - शिवसेना या युतीला दिला असल्याचं म्हटलं होतं. मात्र याच सर्व्हेमध्ये सर्वाधिक लोकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पसंती दिली असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटांमध्ये वाद पाहायला मिळाला होता.

BJP & Shivsena Dispute
Dispute in BJP-Shivsena: युतीत पुन्हा मिठाचा खडा नको; सेना-भाजपने घेतला मोठा निर्णय

त्यानंतर सुधारित जाहिरात बुधवारी (दि.१४) प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावून प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच आजच्या जाहिरातीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांना जनतेनं पसंती दिली असल्याचं जाहिरातीमधील वाक्य वगळण्यात आलं हे विशेष आहे.

शिवसेना शिंदे गटाकडून राज्यातील प्रमुख मराठी, इंग्लिश आणि हिंदी या वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. साधारणत: कुठल्याही वृत्तपत्रांमध्ये राजकीय जाहिरात दर हा सर्वाधिक असतो. शिंदे गटाकडून दोन दिवस देण्यात आलेल्या जाहिरातीचा अंदाजे खर्च 10 ते 15 कोटी रुपये असल्याची माहिती वृत्तपत्रात काम करणाऱ्या एका एजन्सीनं नाव न छापण्याच्या अटीवर दिलेली आहे.

BJP & Shivsena Dispute
Harshvardhan Patil News : हर्षवर्धन पाटलांनी थेट दिल्लीच गाठली ; केंद्रीय मंत्री गडकरींकडे केली 'ही' तक्रार

शिवसेना शिंदे गटाकडून मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमुळे वादंग निर्माण झाले होते मात्र, आता ही जाहिरात शिवसेना पक्षाकडून देण्यात आली नव्हती असं मंत्री शंभूराजे देसाई(Shambhuraj Desai) यांनी म्हटलं होतं. मंगळवारी जाहिरात प्रसिद्धीवर शिवसेना शिंदे गटातील मंत्र्यांची वेगवेगळी भूमिका पाहायला मिळाली होती.

मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नानंतर या संदर्भातील सुधारित जाहिरात पुन्हा प्रसिद्ध करण्यात येईल असं म्हटलं होतं तर शंभुराजे देसाई यांनी ही जाहिरात आम्ही दिली नाही असे म्हटलं होतं. त्यामुळे जाहिरातीच्या वादावरून शिंदे गटात जाहिरात कोणी दिली यावर वेगवेगळे भूमिका पाहायला मिळाली होती.

शिवसेना शिंदे गटाकडून देण्यात आलेल्या जाहिराती मागील वादंग थांबता थांबत नाही आहे. मंगळवारी वृत्तपत्रा प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीचा खर्च करणारा हितचिंतक कोण असा प्रश्न राज्याचे विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांनी शिवसेना शिंदे गटाला विचारला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून घेण्यात आलेल्या बीकेसी येथील दसरा मेळावा दरम्यान एसटी महामंडळाला त्यावेळी देखील अशाच हितचिंतकाने पैसे भरले होते या संदर्भातील देखील अद्यापही खुलासा करण्यात आला नाही आहे असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे.

BJP & Shivsena Dispute
Shekhar Bagade News : भाजपने केली शिंदेंची कोंडी; शेखर बागडेंची थेट एसीबीकडे तक्रार

शिवसेना शिंदे गटाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीचा खर्च कोणी केला असा प्रश्न विरोधकांकडून करण्यात येत आहे दोन दिवस देण्यात आलेल्या पहिल्या पानावरील जाहिरातीचा खर्च हा कोट्यावधी रुपयाचा असल्याचा दावा विरोधी पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. की वृत्तपत्रात देण्यात आलेल्या जाहिरातीचा खर्च 10 कोटी रुपयापेक्षा अधिक असल्याचे म्हटले आहे.

काय आहे जाहिरात?

'राष्ट्रात मोदी अन् महाराष्ट्रात शिंदे' अशी जाहिरात शिवसेनेनं शिंदे गट वर्तमान पत्रांमध्ये छापून आणली. या जाहिरातीवरून वाद झाला होता. त्यानंतर आता भाजप(BJP) शिवसेना युतीची नवी जाहिरात समोर आली आहे. या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो छापण्यात आला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com