Narayan Rane Latest Marathi News
Narayan Rane Latest Marathi News Sarkarnama
कोकण

Maharashtra Politics : नारायण राणेंना पंतप्रधान मोदींनी झापलं; खासदार विनायक राऊतांचा दावा

सरकारनामा ब्यूरो

Narayan Rane News : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबत ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'तुमच्या पीएला आधी हाकला अन्यथा तुमचं मंत्रिपद काढून घेईल', अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी नारायण राणे यांना झापलं, असा दावा खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. विनायक राऊत हे कणकवलीमध्ये नवनिर्वाचित सरपंचांच्या सत्कार कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यासह ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. विनायक राऊत म्हणाले, ''नारायण राणे यांच्याकडे असलेल्या एका पीएने अनेकांना गंडे घातले. मात्र हे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना कळलं तेव्हा मोदींनी राणेंना समज दिली. त्या पीएला आधी हाकला अन्यथा तुमचं मंत्रिपद काढून घेईन, अशा शब्दात राणेंना पंतप्रधानांनी झापलं'', असा दावा त्यांनी केला आहे.

''काही दिवसांपूर्वी झालेल्या अधिवेशनामध्ये केरळच्या खासदाराने लोकसभेत एक प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना नारायण राणेंची भंबेरी उडाली होती. केरळच्या खासदाराने इंग्रजीत प्रश्न विचारला तेव्हा राणेंनी कानाला हेडफोन लावले होते. त्यामध्ये त्या प्रश्नाचे हिंदीत भाषांतर करण्यात आले''.

''मात्र तरी देखील त्यांना प्रश्न समजला नाही. त्यांना प्रश्न केरळबाबत विचारला पण ते तामिळनाडू संदर्भात बोलत होते. यावेळी प्रश्नाला भलतच उत्तर देत त्यांची फजिती झाली. मात्र तेव्हापासून नारायण राणे आजपर्यंत लोकसभेची पायरी चढले नाहीत'', असं विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले.

दरम्यान, नारायण राणे यांच्याबाबत शिवसेना (ठाकरे गट) खासदार विनायक राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राऊतांच्या या गौप्यस्फोटावर नारायण राणे (Narayan Rane) आता काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT