Ahmednagar : अहमदनगरच्या नामांतराचा वाद; ठाकरे गटानं सुचवलं आणखी एक नवं नाव

Ahmednagar News : अहमदनगरच्या नामांतराच्या प्रश्नावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता
Ahmednagar
AhmednagarSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : औरंगाबाद, उस्मानाबादनंतर आता अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आला आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी हिवाळी अधिवेशनात अहमदनगरचे नामांतर करून 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' असं कराव, अशी मागणी केली.

त्यानंतर सरकारने देखील नामांतराबाबत काही हालचाली केल्या. मात्र, याच नामांतराबाबत अनेकजण आपआपली मतं व्यक्त करत आहेत. या नामांतराच्या मुद्यावरून आता ठाकरे गटाने नवं नाव सुचवत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अहमदनगर जिल्ह्याचा नामविस्तार करण्यापेक्षा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, असं मत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं. तर नामांतराविषयी निर्णय घेताना नगरकरांचे मत विचारात घेणे आवश्यक असल्याचे भाजपचे खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil ) यांनी सांगितले. त्यामुळे नामांतराच्या प्रश्नावरून आता भाजपच्या नेत्यामध्ये देखील मतभेद असल्याचे दिसून येत आहे.

Ahmednagar
Nitin Gadkari म्हणाले, खासदार म्हणून वाघांच्या राजधानीत स्वागत करतो…

आता नामांतराच्या मुद्यावरून ठाकरे गटाने नवं नाव सुचवत आपली भूमिका स्पष्ट केलीय. शिवसेनेचे (ठाकरे गट) अहमदनगरचे शहराध्यक्ष संभाजी कदम यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, ''१९८५ साली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची अहमदनगर शहरात सभा झाली होती.

यावेळी नगर शहराला 'अंबिकानगर' हे नाव स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी सुचवले होते. त्यामुळे या नावासाठी आम्ही आज देखील आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले. तर याच नामांतरांच्या प्रश्नाबाबत महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठरावाची वेळ आली तर 'अंबिकानगर' या नावाचा ठराव आम्ही करणार आहोत'', असं त्यांनी सांगितलं.

Ahmednagar
Anil Deshmukh News : अनिल देशमुखांना लागली मतदारसंघाची ओढ : म्हणाले, ‘प्रथम मी काटोलला जाणार...’

दरम्यान, अहमदनगरच्या (Ahmednagar) नामांतरांवरुन भाजपमध्येही मतभेद असून खासदार सुजय विखे आणि आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे आमने सामने आले आहेत. तर आता या नामांतरांच्या प्रश्नामध्ये ठाकरे गटानेही उडी घेतली असून अहमदनगरसाठी नवं नाव सुचवत आपली भूमिका स्पष्ट केलीय. त्यामुळे अहमदनगरच्या नामांतराच्या प्रश्नावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com