Nitesh Rane and Narayan Rane Sarkarnama
कोकण

मुलाची प्रकृती बिघडताच नारायणे राणेंची जिल्हा रुग्णालयात धाव; पण भेट होणार का?

भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची प्रकृती बिघडली आहे.

सरकारनामा ब्युरो

सिंधुदुर्ग : भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्या छातीत दुखत असून, रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे वडील केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे कणकवलीत दाखल झाले असून, ते मुलाला भेटण्यासाठी रुग्णालयात गेले आहेत. दरम्यान, नितेश हे न्यायालयीन कोठडीत असल्याने त्यांना भेटण्याची परवानगी नारायणे राणेंना मिळणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नितेश राणे हे न्यायालयीन कोठडीत आहे. काल (ता.4) रात्री त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. कणकवलीत या घडामोडी घडत असताना नारायण राणेही तेथे दाखल झाले आहेत. कणकवलीतील ओम गणेश बंगल्यात ते थांबले होते. आता ते मुलाला भेटण्यासाठी जिल्हा रुग्णालयाकडे रवाना झाले आहेत. नितेश राणेंना पुढील उपचारासाठी कोल्हापूरला हलवण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.

दरम्यान, नितेश राणे हे न्यायालयीन कोठडीत असल्याने त्यांना भेटण्याची परवानगी नारायणे राणेंना मिळणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण न्यायालयाच्या परवानगीशिवाय न्यायालयीन कोठडीतील आरोपीला भेटता येत नाही. सावंतवाडी कारागृहात न ठेवता नितेश राणेंना रुग्णालयात ठेवावे, असा अर्ज त्यांच्या वकिलांनी कालच केला होता. सावंतवाडी कारागृह अधीक्षकांकडे हा अर्ज करण्यात आला होता. राणे यांची प्रकृती बरी नसल्याचे वकिलांनी आधीच न्यायालयाला कळवले होते. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर राणेंना जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले.

पोलिसांना शरण गेल्यानंतर राणेंना 2 फेब्रुवारीला अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. नंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. राणेंच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. यावर न्यायालय आज दुपारी निर्णय सुनावणार आहे. मागील सुमारे महिनाभरापासून नितेश राणे गायब होते. ते नुकतेच प्रकटले असून, ते मागील काही दिवस कणकवली पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावत होते. उच्च न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज 17 जानेवारीला फेटाळला होता. त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी अटकेपासून संरक्षण उच्च न्यायालयाने कायम ठेवले होते. सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्याने राणे सत्र न्यायालयासमोर शरण आले होते. (Nitesh Rane News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT