Vaibhav Khedekar sarkarnama
कोकण

Vaibhav Khedekar : दोनवेळा प्रवेश हुकला; बडतर्फ मनसे नेत्याचा भाजप प्रवेश बड्या राजकीय नेत्यामुळे रखडला

Vaibhav Khedekar’s BJP Entry stalls again : महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता नेता, कोणत्या पक्षात, कधी प्रवेश करेल याचा काही नेम नाही आणि तसे सांगताही येत नाही. दरम्यान खेडेकर यांनी देखील असाच निर्णय घेतल्याने सध्या ते चांगलेच चर्चेत आहेत.

Aslam Shanedivan

  1. राज ठाकरे यांच्या मनसेतून बाहेर काढल्यानंतर वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश पुन्हा रखडला आहे.

  2. या विलंबामागे एका राजकीय बड्या नेत्याचा हात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

  3. त्यामुळे खेड व सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Khed Politics : राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या प्रमाणात उलथा पालथ होताना दिसत असून अनेक मोठे चेहरे महायुतीत आणि महत्वाचे म्हणजे भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. नुकताच असाच एक प्रवेश तळ कोकणातील भाजपमध्ये होणार होता. मात्र तो दुसऱ्यांदा हुकला. राज ठाकरे यांच्या मनसेनं हाकालपट्टी केलेल्या वैभव खेडेकर यांच्यासह 350 जणांनासाठी अद्याप भाजपची दारे बंदच असल्याने नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न या मराठी म्हणीची सध्या चर्चा होताना दिसत आहे. तर हा पक्ष प्रवेश थांबविण्यात एका राजकीय बड्या नेत्याचा हात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

खेडचे माजी नगराध्यक्ष खेडेकर यांच्यासह तिघांची मनसेनं हाकालपट्टी केली. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांनी याची माहिती दिली. यानंतर खेडेकर यांनी थेट पत्रकार परिषद घेत राज ठाकरेंबाबत नाराजी व्यक्त केली आणि आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगून टाकले. यानंतर भाजप नेते, मंत्री नितेश राणे यांनी देखील पत्रकार परिषद घेत खेडेकर यांच्यासह काही महत्वाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा 4 सप्टेंबरला भाजप प्रवेश होईल अशी घोषणा केली. मात्र त्यावेळी खेडेकर यांचा पक्षप्रवेश हुकला. यामुळे विविध राजकीय चर्चांसह तर्कवितर्कांना सुरूवात झाली होती. त्यापाठोपाठ आता दुसऱ्यांदा पुन्हा एकदा खेडेकर यांचा भाजप प्रवेश मुंबईत जाऊनही न झाल्याने शंकेची पाल चुकचुकायला लागलीय.

यादरम्यान हा पक्षप्रवेश झाला नसला तरी रवींद्र चव्हाण यांच्यांशी खेडेकर यांची भेट झाली आहे. त्यांची चव्हाण यांच्याशी भेटीत सविस्तर झाल्याची माहिती समोर येत आहे. याचवेळी एकीकडे खेडेकरांचा पक्षप्रवेश थांबवण्यासह त्यांचे राजकीय वजन कमी करण्यामागे बड्या स्थानिक नेत्यांचा हात असल्याची चर्चा आहे. यामागे आणखी दोन नेत्यांची नावं चर्चेत असून दोन्ही नेते राजकीयदृष्ट्या अग्रेसर असल्याची चर्चा उघडपणे सुरु झाली आहे. तर दुसरीकडे भाजपच्याच दुसऱ्या एका मोठ्या नेत्याने खेडेकरांच्या पक्ष प्रवेशावर माहिती देताना, त्यांचा पक्षप्रवेश लवकरच होईल, असेही सांगितले आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

कोकणातील राजकारणात सध्या खेडेकर यांचा विषय चर्चेचा ठरला असून 25 तारखेला त्यांचा भाजप प्रवेश होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांसह गाड्यांच्या ताफ्यांसह खेडेकर कोकणातून मुंबईत दाखल झाले होते. मात्र त्यांचा पक्षप्रवेश झालेला नाही. त्यांच्यांवर गेल्या पायी माघारी परतण्याची वेळ आली. खेडेकरांच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त मिळत नसल्यामुळे त्यांचा प्रवेश न होण्यामागे राजकीय हस्तक्षेप असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

दरम्यान खेडेकर यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह डोंबिवली येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली आहे. यानंतर खेडेकर यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला चव्हाण यांच्या भेटीचे व्हिडिओ ठेवले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाजातील 'मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पे घर मत बसा लेना, मै समंदर हू लौटकर जरुर आऊंगा' असा ओडिओही लावला. यामुळे त्यांनी हा कोणाला इशारा दिला अशीही आता चर्चा सुरू झाली आहे.

व्हॉट्सअप स्टेटस पुन्हा एकदा चर्चेत

खेडेकर यांच्या व्हॉट्सअप स्टेटसची पुन्हा एकदा चर्चा होताना दिसत असून त्यांनी, 'तुमच्या जिद्दीसमोर चक्रव्यूह सुद्धा फिका पडेल, असे म्हटले आहे. त्यांनी, राजकारणात थोडा उशीर झाला तरी जनतेचे प्रेम कायम तुमच्या पाठीशी राहील' आमचे राजकीय अस्तित्व संपवणे इतके सोपे नाही, असे म्हणत टोला लगावला आहे. तर तुमच्याकडे पैसा असेल पण बुद्धी आम्हाला खानदानी देणगी आहे, जो धाडस करतो त्यालाच यश मिळते अशा शब्दाल विरोधकांवर पलटवार स्टेटसमधून केला आहे.

FAQs :

प्र.१: वैभव खेडेकरांना मनसेतून का बाहेर काढण्यात आलं?
उ. राज ठाकरे यांच्या निर्णयामुळे पक्षांतर्गत कारणांमुळे त्यांची हाकालपट्टी झाली.

प्र.२: सध्या ते कोणत्या पक्षात जाण्याची तयारी करत आहेत?
उ. वैभव खेडेकर भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहेत.

प्र.३: भाजप प्रवेश का रखडला आहे?
उ. एका राजकीय बड्या नेत्याच्या दबावामुळे प्रवेश पुढे ढकलला गेल्याची चर्चा आहे.

प्र.४: या प्रकरणामुळे स्थानिक राजकारणात काय परिणाम झाला आहे?
उ. खेड आणि सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणात अनिश्चितता व खळबळ निर्माण झाली आहे.

प्र.५: भाजप प्रवेशाबाबत पुढील घडामोडी कधी होऊ शकतात?
उ. अद्याप अधिकृत तारीख किंवा निर्णय जाहीर झालेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT